तामिळनाडूमधील त्रिचुनगुड येथे सुरू असलेल्या ६२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राने तामिळनाडूचा रोमहर्षक लढतीत पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मुख्य सामन्यात सामना संपायला दीड मिनिटे बाकी असताना महेंद्र रजपूतने दोन गुण घेत महाराष्ट्राला ७-७ अशी बरोबरी साधून दिली. मग पाच-पाच चढायांच्या डावांतही बरोबरी झाली. त्यानंतर नितीन मदनेने सुवर्णचढाईत गुण घेत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राची सेनादलाशी गाठ पडणार आहे.

IPL 2024: कोण आहे मल्लिका सागर? आयपीएल लिलावात साकारणार लिलावकर्त्याची भूमिका, जाणून घ्या