दुबईत पार पडणाऱ्या दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम ६ संघ सहभागी होणार असून भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. भारतासोबत अ गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि केनिया हे संघ सहभागी होणार आहेत. तर ब गटात इराण, कोरिया, अर्जेंटीनाचा समावेश करण्यात आलेला आहे. २२ ते ३० जून या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून क्रीडाप्रेमींना या स्पर्धेचे सामने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येणार आहेत.

स्पर्धेची गटवारी –

अ गट : भारत, पाकिस्तान, केनिया

ब गट : इराण, कोरिया, अर्जेंटिना

 

दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचं वेळापत्रक –

२२ जून – भारत विरुद्ध पाकिस्तान, इराण विरुद्ध कोरिया

२३ जून – इराण विरुद्ध अर्जेंटिना, भारत विरुद्ध केनिया

२४ जून – कोरिया विरुद्ध अर्जेंटिना, पाकिस्तान विरुद्ध केनिया

२५ जून – इराण विरुद्ध कोरिया, भारत विरुद्ध पाकिस्तान

२६ जून – इराण विरुद्ध अर्जेंटिना, भारत विरुद्ध केनिया

२७ जून – कोरिया विरुद्ध अर्जेंटिना, पाकिस्तान विरुद्ध केनिया

२९ जून – पहिला उपांत्य सामना, दुसरा उपांत्य सामना

३० जून – अंतिम सामना

 

सामना सुरु होण्याची वेळ – पहिला सामना रात्री ८ वाजता, दुसरा सामना रात्री ९ वाजता