Kane Williamson Bizzare Dismissal Video: इंग्लंड वि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन असा काही विचित्र पद्धतीने बाद झाला की सर्वच जण अवाक् झाले आहेत. विरोधी संघाचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्सच्या चेंडूवर किवीचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन दुर्दैवीरित्या बाद झाला. त्याने स्वत:लाच क्लीन बोल्ड करून घेतले.

इंग्लंडच्या गोलंदाजीदरम्यान ५९व्या षटकात ही आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. मॅथ्यू पॉट्स गोलंदाजी करत होता. तर केन विल्यमसन फलंदाजीसाठी क्रीझवर उभा होता. पॉट्सने षटकातील शेवटचा चेंडू स्टंपच्या कोनात टाकला. जिथे विल्यमसनने हलक्या हाताने बचावात्मक शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने चेंडू बॅटला लागून स्टंपला लागला. केनने पायाने चेंडू मारत वाचवण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्या नादात चेंडू विकेटवर जाऊन आदळला.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?

केन विल्यमसन क्लीन बोल्ड झाल्यानंतर मैदानावरच त्याने राग आणि निराशा व्यक्त केली आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. केन विल्यमसन या सामन्यात चांगली फलंदाजी करत ४४ धावा करून खेळत होता. पण पुन्हा एकदा विल्यमसन दुर्देवीरित्या बाद झाला आहे. त्याच्या या विकेटचा व्हीडिओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे.

हेही वाचा – D Gukesh: गुकेशच्या विश्वविजेतेपदाने रशियाला पोटशूळ; डिंग लिरेनवर केला मुद्दाम हरल्याचा आरोप

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बाद होण्यापूर्वी विल्यमसन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण ८७ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो ५०.५७ च्या स्ट्राइक रेटने ४४ धावा करण्यात यशस्वी झाला. यादरम्याने त्याने नऊ चौकार लगावले होते.

हेही वाचा –VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी संघाला चांगली सुरूवात करून देत १०५ धावांची भागीदारी रचली. विल्यमसननेही चांगली फलंदाजी करत डाव पुढे नेला. पण केन विल्यमसन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडने विकेट गमावल्या. संघाने लागोपाठ विकेट्स गमावल्या आहेत. यामुळे एकेकाळी मजबूत स्थितीत दिसत असलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ९ गडी गमावून ३१५ धावा करता आल्या.

Story img Loader