विल्यमसनचे नाबाद शतक

केन विल्यमसनचे नाबाद शतक आणि टॉम लॅथमच्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २ बाद २४० अशी दमदार मजल मारली आहे.

केन विल्यमसनचे नाबाद शतक आणि टॉम लॅथमच्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २ बाद २४० अशी दमदार मजल मारली आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांनी ९ धावांवर पहिला फलंदाज गमावला. त्यानंतर लॅथम (८३) आणि विल्यम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी रचत संघाला सुस्थितीत आणले. विल्यमसनने ११ चौकारांच्या जोरावर नाबाद १०५ धावांची खेळी साकारत कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kane williamson ton puts new zealand on track