scorecardresearch

Suryakumar Yadav: सूर्या-सॅमसनच्या तुलनेवर कपिल देव यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “सूर्याला जास्त…”

IND vs AUS ODI Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. सूर्यकुमार यादव या मालिकेत सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर संजू सॅमसन सोशल मीडियावर चर्चेचा विषय होऊ लागला.

kapil dev said Don’t compare Suryakumar Yadav with Sanju Samson
सूर्या आणि कपिल (फोटो-संग्रहुत छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Kapil Dev on Suryakumar Yadav: गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे दोघे सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव तिन्ही डावात गोल्डन डकचा बळी ठरला. त्यानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवपेक्षा संजू सॅमसनला प्राधान्य देण्याची चर्चा सुरू झाली. या सगळ्या दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या बचावासाठी कपिल देव पुढे आले आहेत. सूर्यकुमार यादवला पाठीशी घालून संघ व्यवस्थापन योग्य निर्णय घेत असल्याचे कपिल देव यांचे मत आहे.

शेवटी संघ व्यवस्थापनालाच निर्णय घ्यायचा असतो –

कपिल देव एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले, “ज्या क्रिकेटपटूने चांगली कामगिरी केली आहे, त्याला अधिक संधी मिळतील. इथे सूर्याची संजूशी तुलना करायची गरज नाही. जर संजू देखील वाईट टप्प्यातून गेला, तर तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलाल. असे होऊ नये, संघ व्यवस्थापनाने सूर्याला पाठीशी घालण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याला आणखी संधी द्यायला हवी. होय, लोक बोलतील, त्यांचे मतही मांडतील, पण शेवटी संघ व्यवस्थापनालाच निर्णय घ्यायचा असतो.”

सामना संपल्यानंतर बोलणे खूप सोपे आहे –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. तो दोन्ही वेळा गोल्डन डक होत बाद झाला, तिसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. कपिल देव पुढे म्हणाले, “सामना संपल्यानंतर बोलणे खूप सोपे आहे. सूर्याला सातव्या क्रमांकावर पाठवले जाण्याची शक्यता अशी असेल की, जेणेकरून त्याला फिनिशर बनण्याची संधी दिली जाईल. एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीतील बदल ही नवीन गोष्ट नाही.”

हेही वाचा – IPL 2023: राजस्थान रॉयल्सला प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मिळाला बदली खेळाडू; ‘हा’ अनुभवी गोलंदाज संघात झाला सामील

कपिल देव पुढे म्हणाले, “हो, कधी कधी असे घडते की फलंदाजाचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे त्याला फलंदाजीच्या खालच्या क्रमावर पाठवले जाते. पण अशा परिस्थितीत मी माझे दडपण हाताळू शकतो हे प्रशिक्षक किंवा कर्णधाराला सांगणे ही खेळाडूची जबाबदारी असते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 15:13 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या