जेव्हा कपिल देव-दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आमने-सामने येतात…

खुद्द कपिल देवने सांगितला ‘तो’ किस्सा

भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याला भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेवरून सडेतोड उत्तर दिले होते. करोना विरोधात निधी उभा करण्यासाठी भारत पाक क्रिकेट मालिका भरवावी असा प्रस्ताव अख्तरने ठेवला होता. त्यावर, आम्हाला अशा प्रकारे निधी जमावण्याची गरज नाही, असं उत्तर कपिल देवने दिलं होतं. त्यानंतर आता कपिल देव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

“…त्यानंतर विराट परत माझ्या नादी लागला नाही”

कपिल देव याने नुकतीच इंडियाटुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत कपिलने त्याची आणि दाऊदची भेट याबद्दल एक रोमांचक असा किस्सा सांगितला. “मला आठवतंय की १९८७ साली शारजा येथील सामन्याच्या दिवशी एक माणूस ड्रेसिंग रूम मध्ये आला. त्याला आमच्या खेळाडूंशी बोलायचं होतं. पण मी लगेच त्या माणसाला ड्रेसिंग रूममधून बाहेर जायला सांगितलं, कारण खेळाडू सोडून इतर कोणालाही ड्रेसिंग रूम मध्ये येण्याची परवानगी नसते. त्या माणसाने माझं लगेच ऐकलं आणि काहीही न बोलता तो बाहेर निघून गेला”, असं कपिल म्हणाला.

त्यांचे काही वेगळेच खेळ सुरू होते – हरभजन

पुढे बोलताना कपिलने सांगितलं, “मला माहिती नव्हतं की तो माणूस कोण आहे. मी त्याला सरळ बाहेरचा रस्ता धरायला सांगितला. त्यानंतर कोणीतरी मला सांगितलं की तो मुंबईचा स्मगलर आहे आणि त्याचं नाव दाऊद इब्राहिम आहे. बास… त्यापेक्षा अधिक काहीच घडलं नाही”, असं कपिल देव म्हणाला.

धोनी नव्हे, ‘हा’ खेळाडू पुन्हा टीम इंडियात हवा; रोहितने व्यक्त केली इच्छा

जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी हाच किस्सा सांगितला होता. मात्र त्यात दाऊदने खेळाडूंना टोयोटा कारची ऑफर दिली असल्याचा उल्लेख होता. याबाबत कपिल देव म्हणाला की कारच्या ऑफरबद्दल मला काही माहिती नाही. पण दिलीप म्हणतोय तर त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kapil dev ordered dawood ibrahim to leave dressing room in 1987 sharjah match vjb

ताज्या बातम्या