Karanbir Singh Breaks Rohit Sharma Record: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला हिटमॅन म्हटलं जातं. यामागचं कारण म्हणजे, त्याने आतापर्यंत मारलेले षटकार. रोहितने षटकारांचे अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. पण यापैकी एक रेकॉर्ड ऑस्ट्रियाच्या फलंदाजाने मोडून काढला आहे. ऑस्ट्रिया आणि हंगरी या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंगने अवघ्या ५७ चेंडूंचा सामना करत १६४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १८ चौकार आणि १२ षटकार खेचले. या खेळीदरम्यान त्याने रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड मोडून काढत नंबर १ स्थानी कब्जा केला आहे.
या सामन्यात फलंदाजी करताना त्याने हंगरीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या १२ षटकारांसह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नावे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०५ षटकार खेचण्याची नोंद आहे. आता करणबीर सिंगने हा रेकॉर्ड मोडून काढले आहेत. करणबीर सिंगच्या नावे २०७ षटकार खेचण्याची नोंद आहे. या रेकॉर्डमध्ये रोहित करणबीर सिंगला मागे टाकू शकत नाही, कारण त्याने २०२४ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यूएईचा फलंदाज मुहम्मद वसीम तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावे १९६ षटकार मारण्याची नोंद आहे. तर चौथ्या स्थानी असलेल्या रोहित शर्माच्या नावे १७९ षटकार खेचण्याची नोंद आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
करणबीर सिंग- २०७ षटकार
रोहित शर्मा- २०५ षटकार
मुहम्मद वसीम- १९६ षटकार
सूर्यकुमार यादव- १७९ षटकार
जोस बटलर- १७५ षटकार
मार्टीन गप्टील- १७३ षटकार
बाबर हयाट- १६६ षटकार
सईद अजिज- १५७ षटकार
रोमन पॉवेल- १५६ षटकार
ग्लेन मॅक्सवेल- १५० षटकार
कोण आहे करणबीर सिंग?
करणबीर सिंग हा ऑस्ट्रिया संघाचं प्रतिनिधित्व करतो. ३० वर्षीय करणबीर सिंगला २५ मे २०२४ मध्ये बेल्जियमविरूद्ध झालेल्या सामन्यातून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने आतापर्यंत झालेल्या ६० सामन्यातील ५९ डावात फलंदाजी करताना ४८.७१ च्या सरासरीने २५३३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतकं आणि २० अर्धशतकं झळकावली आहेत
