स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेची अंतिम लढत काही तासांवर आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर होणाऱ्या या लढतीत कर्नाटक आणि तामिळनाडू आमनेसामने आहेत. मात्र या सामन्यात दोन्ही संघ जेतेपदाचे दावेदार आहेत. कोणाचेच पारडे जड नाही, असे मत तामिळनाडूचे प्रशिक्षक डब्ल्यु़ व्ही. रामन यांनी व्यक्त केले.
गतवर्षी कर्नाटकने रणजी करंडक पटकावला होता आणि १९७३-७४ नंतर ते त्यांचे पहिले जेतेपद होत़े  दुसरीकडे तामिळनाडूने १९८७-८८ मध्ये अखेरचे जेतेपद पटकावले होत़े  त्या संघात रामन यांचाही सहभाग होता़  ‘‘ दोन चांगले संघ खेळत आहेत आणि ही लढत अटीतटीची होईल,’’ अशी रामन यांनी आशा व्यक्त केली आह़े  ४९ वर्षीय रामन यांच्या मते जो संघ महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावेल किंवा संधी अचूक  हेरेल त्याचेच पारडे जड असणार आह़े  
ते म्हणाले, ‘‘ सामन्यातील महत्त्वाचा क्षण ओळखण्यात, तसा निर्माण करण्यात आणि त्याचा योग्य फायदा उचलण्यात यशस्वी होईल, तोच संघ जेतेपद पटकावेल़  कर्नाटकला साखळी सामन्यात सोपा विजय मिळवता आलेला नाही़   याचा अर्थ कठीणप्रसंगी कोणते डावपेच आखायचे आणि त्यातून बाहेर कसे पडायचे, याची त्यांना जाण आह़े ’’