छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपति १३’ या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड असतो. या एपिसोडमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी टोक्यो ऑल्मिपिकमध्ये भारतासाठी पदक मिळवत आपल्या देशाचे नाव उंच करणाऱ्या खेळाडूंनी हजेरी लावली आहे. त्यात भारताचा गोल्डन बॉय आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेश यांनी हजेरी लावली आहे. यावेळी श्रीजेशने त्याने आणि संपूर्ण हॉकी टीमने किती संघर्ष केला ते सांगितले.

अमिताभ यांनी श्रीजेशला त्यांचा पोडियमवर उभं राहिल्यावर काय वाटलं या विषयी विचारले. तर श्रीजेश म्हणाला, ‘२०१२ मध्ये ऑलिम्पिकसाठी कॉलिफाय झालो. मात्र, आम्ही एकही सामना जिंकलो नाही. त्यावेळी आम्ही १२ व्या क्रमांकावर होतो. आम्ही भारतात परतल्यानंतर लोक आमच्यावर हसायचे. लोक म्हणायचे की जर अजून टीम असत्या तर टीम इंडिया अजून पाठी राहिली असती. जेव्हा कोणत्या कार्यक्रमात जायचे तेव्हा त्यांना मागे बसवले जायचे. आमचा खूप अपमान करण्यात आला. कधीकधी वाटायचं की आम्ही हॉकी का खेळत आहोत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आम्ही खेळाडूंना हेच सांगितले की फक्त विचार करा की यापुढे कोणताही सामना नाही आहे. आता पदक मिळवल्यानंतर असे वाटते की आता जेवढं ऐकल, जितले संघर्ष केले, जितके रडलो, सर्व काही संपलं आहे,’ असे श्रीजेशने सांगितले. हे ऐकूण अमिताभ भावूक झाले.

आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

आणखी वाचा : ‘तिच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत आहे की…’, बोल्ड ड्रेसने फजिती केल्यानंतर नोरा फतेही झाली ट्रोल

या आधी ‘शानदार शुक्रवार’मध्ये सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागने हजेरी लावली होती. तर गणेशोत्सव आणि शानदार शुक्रवारच्या निमित्ताने दीपिका पादूकोण आणि फराह खानने हजेरी लावली होती.