KBC 13: सौरव गांगुली आणि सेहवागला धोनीशी संबंधित ‘या’ प्रश्नाचे देता आली नाही उत्तर, घ्यावी लागली एक्सपर्टची मदत

‘केबीसी १३’च्या ‘शानदार शुक्रवार’च्या एपिसोडमध्ये सौरव गांगुली आणि सेहवागने हजेरी लावली होती हजेरी.

virender sehwag, sourav ganguly, ms dhoni,
'केबीसी १३'च्या 'शानदार शुक्रवार'च्या एपिसोडमध्ये सौरव गांगुली आणि सेहवागने हजेरी लावली होती हजेरी.

माहितीचा स्त्रोत म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे पाहिले जाते. यंदाचे शोचे १३ पर्व सुरु आहे. या शोच्या ‘शानदार शुक्रवार’च्या एपिसोडमध्ये भारतीय टीमचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्ज क्रिकेटर सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हजेरी लावली होती. यावेळी सौरव आणि वीरेंद्र यांनी अमिताभ यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या आणि प्रश्नांचे उत्तर देखील दिले. या दोघांनी त्यांच्या फाऊंडेशनसाठी २५ लाख रुपये जिंकले. शोमध्ये प्रश्नांची उत्तर देताना गांगुली आणि सेहवागने चारही हेल्प लाईन्सचा वापर केला. मात्र, त्यांना क्रिकेट संबंधित एका प्रश्नासाठी एक्सपर्टची मदत घ्यावी लागली. हा प्रश्न भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी संबंधित होता.

क्रिकेटचे दोन दिग्ज खेळाडू आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांला वाटतं होती की क्रिकेट संबंधी एकतरी प्रश्न हा विचारला पाहिजे. तर तसेच झाले आणि अमिताभ यांनी क्रिकेटशी संबंधित एक प्रश्न सौरव आणि वीरेंद्रला विचारला. मात्र, त्यांना क्रिकेट संबंधित एका प्रश्नासाठी एक्सपर्टची मदत घ्यावी लागली.

आणखी वाचा : KBC 13: ‘या’ प्रश्नाचं उत्तर देत सौरव गांगुली आणि सेहवागने जिंकले २५ लाख; तुम्हाला उत्तर माहितीये का?

क्रिकेटशी संबंधीत तो प्रश्न कोणता होता?

ट्रॅविस डाउलिनची विकेट कोणत्या माजी भारतीय कर्णधाराची एकमेव आंतरराष्ट्रीय विकेट होती?

A) एमएस धोनी
B) मोहम्मद अझरुद्दीन
C) सुनील गावस्कर
D) राहुल द्रविड

हा प्रश्न ऐकल्यानंतर सौरव आणि वीरेंद्र सुरुवातीला गोंधळले होते. मात्र, त्यानंतर दोघांनी वेगवेगळी उत्तर दिली. सौरव यांनी सुनील गावस्कर यांचे नाव घेतले, तर सेहवागने मोहम्मद अझरुद्दीन यांचे नाव घेतले. त्यानंतर दोघांनी उत्तर दिले की आम्हाला एकमेकांच उत्तर पटलेलं नाही आम्ही सहमत नाही. बऱ्याच गोंधळानंतर सौरव आणि सेहवागनं या प्रश्नावर शेवटची लाईफलाईन एक्सपर्टची मदत घेतली.

आणखी वाचा : ‘माझी नोकरी धोक्यात येईल’, अमिताभ यांनी वीरेंद्र सेहवागकडे सौरव गांगुलींची केली तक्रार

दरम्यान, एक्सपर्टने या प्रश्नाचे उत्तर महेंद्र सिंह धोनी असल्याचे सांगितले. ‘ट्रॅविस डाउलिन २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळला. महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात दिनेश कार्तिकला विकेट देत ही विकेट घेतली होती. यानंतर धोनीने आणखी एक विकेट घेतली, पण पंचांनी ती नाकारली. यामुळे धोनीच्या नावावर एकच आंतरराष्ट्रीय विकेट आहे आणि ती म्हणजे ट्रॅविस डाउलिनची,’ असे एक्सपर्टने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 virender sehwag and sourav ganguly could not answer question related to ms dhoni dcp

ताज्या बातम्या