सध्या, कन्नड चलनचित्र कपचा तिसरा हंगाम म्हणजेच केसीसी टी-२० चॅम्पियनशिप २०२३ सुरू आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स विजयनगरा पॅट्रियट्सकडून खेळत आहे. गिब्सने गेल्या गुरुवारी आपला ४९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत दक्षिण भारतीय अभिनेता किच्चा सुदीप आणि क्रिकेट दिग्गज सुरेश रैना, युनिव्हर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेल, तिलकरत्ने दिलशान, सुब्रमण्यम बद्रीनाथ उपस्थित होते.

दरम्यान हर्शल गिब्सच्या वाढदिवसाला हे सर्व दिग्गज एकत्र बसून जेवताना दिसले. तसेच सर्वांनी खूप एन्जॉय केला. सध्या किच्चा सुदीप चित्रपटांसह सीसीएलचा भाग आहे. या सर्व खेळाडूंचे एकत्र काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: “विराट कोहलीला आऊट करशील का?” मनिमरन सिध्दार्थने कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, पाहा VIDEO
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

हर्शल गिब्सला इतिहासातील सर्वात वादग्रस्त क्रिकेटपटूंपैकी एक मानले जाते. या स्फोटक खेळाडूची १७५ धावांची खेळी क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या ३३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रोटीज संघाने गिब्सच्या झंझावाती खेळीमुळे विजय मिळवला. त्याच वेळी गिब्सने नंतर कबूल केले की आपण दारूच्या नशेत ही खेळी खेळली होती. तसेच गिब्सची त्याच्या काळातील सर्वात वादळी फलंदाजांमध्ये गणना केले जाते.

हेही वाचा – Rohit Sharma: “विराटकडून काहीतरी शिक” म्हणत कपिल देव यांनी रोहित शर्माला ‘या’ गोष्टीवरून झापलं

विशेष म्हणजे जानेवारीच्या अखेरीस ही स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही होत आहे. हा चषक जिंकणे हे किच्चा सुदीपचे स्वप्न असून याच्याशी संबंधित सर्व खेळाडू त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. या स्पर्धेत गंगा वॉरियर्स, राष्ट्रकूट पँथर्स, विजयनगर पॅट्रियट्स, वोडेयार चार्जर्स आणि होयसाला ईगल्स असे एकूण ६ संघ खेळत आहेत.