सामना संपल्यानंतर बसमधून प्रवास करत असताना रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहितने रविंद्र जाडेजा आणि केदार जाधवसोबत गप्पा मारल्या आहेत. जाडेजाच्या खेळीचं कौतुक केल्यानंतर रोहितने गमतीमध्ये केदार जाधवला Race 4 चित्रपटात संधी मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
रोहितच्या या मस्करीला केदारनेही तितकचं समर्पक उत्तर देत, होय मला विचारण्यात आलं असून सध्या मानधनावर चर्चा सुरु आहे असं म्हटत रोहितच्या मस्करीला तितकीच दिलखुलास दाद दिली आहे. ३० मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.