ZIM vs SA Keshav Maharaj Record: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वेविरूद्ध कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात केशव महाराज संघाचं नेतृत्त्व करत आहे. तेंबा बावुमाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची जबाबदारी केशव महाराजला देण्यात आली. केशव महाराजने संघाचं नेतृत्तव करताना अशी कामगिरी केली आहे, जी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी इतिहासात यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नाही.

दक्षिण आफ्रिकेने दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४१८ धावा करत डाव घोषित केला. तर झिम्बाब्वे दुसऱ्या डावात २५१ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामध्ये कर्णधार केशव महाराजने ३ विकेट्स घेतले. महाराजने २ विकेट्स घेत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. केशव महाराज हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. तो श्रीराम आणि हनुमानाचा मोठा भक्त आहे. इन्स्टाग्रामलाही त्याने अकाऊंटच्या बायोमध्ये जय श्री राम आणि जय हनुमान असं लिहिलं आहे.

केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत २०० विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनला बाद करून ही कामगिरी केली. ३५ वर्षीय केशव महाराज गेल्या नऊ वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि या फॉरमॅटमध्ये आघाडीचा फिरकी गोलंदाज म्हणून त्याने आपलं नाव कमावलं आहे. तो याआधीच दक्षिण आफ्रिकेचा कसोटीत सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. केशव ह्यू टायफिल्डचा १७० विकेट्सचा विक्रम मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला.

केशव महाराजच्या गोलंदाजीवर जेव्हा इर्विनला काइल वेरेनने यष्टीचीत केले तेव्हा २०० कसोटी विकेट्स सह त्याने एक नवा विक्रम केला. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाच्या नावावर आता ५९ कसोटी सामन्यात २०२ विकेट आहेत. त्याने ११ वेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे आणि एकदा सामन्यात १० विकेट्सही घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेसाठी २०० पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा महाराज हा नववा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे. डेल स्टेन हा या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने ९३ कसोटी सामन्यांमध्ये ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. फिरकी गोलंदाजांमध्ये महाराज आणि टेफिल्डनंतर पॉल अॅडम्सचे नाव येते ज्याने १३४ विकेट्स घेतल्या. पॉल हॅरिस (१०३) आणि निकी बोए (१००) हे दक्षिण आफ्रिकेचे इतर फिरकीपटू आहेत ज्यांनी कसोटी सामन्यात किमान १०० विकेट घेतले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे जगातील डावखुरे फिरकी गोलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रंगना हेरथ (श्रीलंका)- ४३३
डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड)- ३६२
रवींद्र जडेजा (भारत)- ३२४
डेरेक अंडरवुड (इंग्लंड)- २९७
बिशनसिंग बेदी (भारत)- २६६
शकीब अल हसन (बांगलादेश)- २४६
तैजुल इस्लाम (बांगलादेश)- २३७
केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)- २००