scorecardresearch

Premium

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराट कोहलीसाठी लिहिली पोस्ट; अनुष्का शर्माने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

केविन पीटरसनच्या पोस्टने भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. अगदी विराट कोहलीची पत्नी अनुष्कानेही पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

virat kohli
विराट कोहली (फोटो सौजन्य – ट्विटर)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला खेळाडू आहे. त्याच्या खराब फॉर्म आणि कामगिरीमुळे त्याच्यावर अनेक माजी भारतीय खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे. अशा स्थितीमध्ये काही परदेशी खेळाडू मात्र, त्याच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांनी विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. अशाच खेळाडूंमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनचाही समावेश होतो. पीटरसनने विराट कोहलीसाठी अतिशय हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. ती बघून अनुष्का शर्माला रहावले गेले नाही. तिने पीटरसनच्या पोस्टवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केविट पीटरसनने विराट कोहलीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्याने कोहलीसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. “मित्रा, तुझी कारकिर्द अतिशय विशेष ठरली आहे. आतापर्यंत तू जे केले ते करण्याचे इतर लोक फक्त स्वप्न बघू शकतात. त्याचा अभिमान बाळग, यश मिळवत जा आणि जीवनाचा आनंद घे. क्रिकेट व्यतिरिक्तही आयुष्यात बरेच काही आहे. तू नक्की पुनरागमन करशील,” अशी कॅप्शन पीटरसनने या फोटोला दिली आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

केविन पीटरसनच्या या पोस्टने भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. अगदी विराट कोहलीची पत्नी अनुष्कानेही हार्ट इमोजी शेअर करून पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी आणि खुद्द विराट कोहलीने देखील पीटरसनच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Singapore Open: पी व्ही सिंधूनं गाजवलं मैदान, सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात मारली बाजी

अलीकडच्या काळात विराटच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपले म्हणणे मांडताना कोहलीला टी २० संघातून वगळण्याची मागणी केली होती. त्यानंतर, कर्णधार रोहित शर्माने विराटचे जोरदार समर्थन केले होते. याशिवाय, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेदेखील ट्विट करून कोहलीला समर्थन दिले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kevin pietersen wrote heart warming post for virat kohli anushka sharma and suniel shetty reacted vkk

First published on: 17-07-2022 at 14:47 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×