Kieron Pollard to join MI in IPL 2025 : आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएल संघांनी तयारी सुरु केली आहे. आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनमध्ये बऱ्याच खेळाडूंचा समावेश असणार आहे. कारण यावेळी आयपीएल संघांना चार ते पाच खेळाडूच रिटेन करता येणार असून इतर सर्व खेळाडूंना रिलीज करावे लागणार आहे. म्हणजेच एकंदरीत सर्व संघांना आपली पुनरबांधणी करावी लागणार आहे. अशात पोलार्ड तात्या नावाने आयपीएलमध्ये प्रसिद्ध असलेल्या किरॉन पोलार्डचे आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून पुनरागमन असल्याची चर्चा सुरु आहे.

किरॉन पोलार्ड हा देशातील प्रतिष्ठित लीग आयपीएलमध्ये दीर्घकाळ मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीसाठी प्रदर्शन केले आहे. मात्र, मागील काही वर्षांपूर्वी त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. आता, तो कॅरिबियन प्रीमियर लीग २०२४ मधील त्याच्या स्फोटक खेळीमुळे चर्चेत आला आहे. ज्यामुळे तो आयपीएलमधील रिटायरमेंट मागे घेऊन पुन्हा खेळताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलार्डने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India win Over Bangladesh in Kanpur Test IND vs BAN
IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Rohit Sharma Doesnt Have the Best Technique Said Fielding Legend Jonty Rhodes
Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

किरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये खेळणार का?

किरॉन पोलार्डने सेंट लुसिया किंग्जने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने त्रिनबागो नाइट रायडर्स १९ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने २७३.६८ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५२ धावा केल्या. यावेळी त्याच्या बॅटमधून एकही चौकार दिसला नाही, पण त्याने स्फोटक फलंदाजी करत एकूण ७ षटकार ठोकले. त्याचबरोबर संघाला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.

हेही वाचा – Mashrafe Mortaza : बॉम्बस्फोट आणि गोळीबार प्रकरणात बांगलादेशच्या माजी कर्णधाराचे नाव, FIR दाखल

किरॉन पोलार्डची आयपीएल कारकीर्द –

जर आपण पोलार्डच्या आयपीएल कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने २०१० मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले होते. त्यानंतर तो या पाच वेळा चॅम्पियन संघाचा भाग राहिला. त्याने मुंबईसाठी एकूण २११ सामने खेळले आणि त्यादरम्यान त्याने १४७ च्या स्ट्राइक रेटने ३९१५ धावा केल्या. त्याने चॅम्पियन्स लीग आणि आयपीएलसह गोलंदाजीत ७९ विकेट्स घेतल्या आहेत.