विनेश फोगटला सुवर्णपदक

करोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले आहे

(संग्रहित छायाचित्र)
कीव्ह कुस्ती स्पर्धा

करोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने २०१७च्या विश्वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्कायला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेचे सुवर्णपदक जिंकले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. मग कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी साधली. मग विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. कॅलाडझिन्स्कायने दडपण वाढवत चार गुणांची कमाई करीत पुन्हा आगेकूच केली. पण विनेशने चार गुणांची कमाई करीत १०-८ अशा फरकाने लढतीवर वर्चस्व गाजवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kiev wrestling competition vinesh won the gold medal abn