#KingKohli: नेटकऱ्यांनी केला ‘दस हजारी’ मनसबदाराला मानाचा मुजरा

सेहवाग, लक्ष्मण, कैफ यांनीही ट्विटवरून विराटचे कौतुक केले

#KingKohli टॉप ट्रेण्ड

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. सचिनने २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ २०५ डावांमध्ये हा पराक्रम केला. या विक्रमानंतर नेटकऱ्यांनी विराटवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. #KingKohli आणि #ViratKohli हे दोन हॅशटॅग वापरून नेटकऱ्यांनी या नवख्या ‘दस हजारी’ मनसबदाराला मानाचा मुजराच केला आहे. ट्विटवर हे दोन्ही हॅशटॅग काहीकाळ टॉप ट्रेण्डमध्ये होते. सामान्यांबरोबरच आजी-माजी क्रिकेटपटूंनी आणि मान्यवरांनीही विराटला शुभेच्छा दिल्या. जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे विराटला शुभेच्छा देताना…

वा… एक हजार धावा केवळ ११ डावांमध्ये: विरेंद्र सेहवाग

काय भन्नाट खेळाडू आहे हा: मोहम्मद कैफ

धावांची भूक अभूतपूर्व: व्ही. व्ही. एस लक्ष्मण

राजस्थान रॉयल्स

१० हजार धावांचा पल्ला गाठणारे खेळाडू – 

 • सचिन तेंडूलकर (भारत)- १८ हजार ४२६ धावा (भारत)
 • कुमार संगकारा (श्रीलंका) – १४ हजार २३४ धावा
 • रिकी पॉण्टींग (ऑस्ट्रेलिया) – १३ हजार ७०४ धावा
 • सनथ जयसुर्या (श्रीलंका) – १३ हजार ४३० धावा
 • महेला जयवर्धने (श्रीलंका) – १२ हजार ६५० धावा
 • इंजमाम उल हक (पाकिस्तान) – ११ हजार ७३९ धावा
 • जॅक कॅलिस (द. आफ्रिका) – ११ हजार ५७९ धावा
 • सौरभ गांगुली (भारत) – ११ हजार ३६३ धावा (भारत)
 • राहुल द्रविड (भारत) – १० हजार ८८९ धावा (भारत)
 • ब्रायन लारा (वे. इंडिज) – १० हजार ४०५ धावा
 • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – १० हजार २९० धावा
 • महेंद्र सिंग धोनी (भारत) – १० हजार १२३ धावा (* निवृत्त झालेला नाही) (भारत)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kingkohli trends top on twitter as virat kohli reaches 10000 runs

ताज्या बातम्या