Records In IPL History : पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोनने आयपीएल २०२२ मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून धुमाकूळ घातला होता. लियामने सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात एकच षटकार ठोकला अन् विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलच्या इतिहासात २०२२ पूर्वी असा विक्रम कुणीच करु शकला नाही. लियामने पंजाबकडून खेळताना हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात १५ व्या षटकात १००० वा षटकार ठोकून इतिहास रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९७ मीटरचा षटकार ठोकून लियामने मैदान गाजवलं

लियाम लिविंगस्टोनचा हा षटकार आयपीएल २०२२ सीजनचा १००० वा षटकार होता. लियामने सनरायजर्स विरोधात झालेल्या सामन्यात रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर ९७ मीटरचा षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता.

नक्की वाचा – IPL : प्ले ऑफ सामन्यात ‘या’ ४ खेळाडूंनी केला होता धमाका; मैदानात ठोकले वादळी शतक

आयपीएलच्या कोणत्याही सीजनमध्ये सर्वात जास्त षटकारांचा विक्रम

आयपीएल २०२२ सीजनमध्ये एकूण १०६२ षटकार ठोकले होते. याआधी कोणत्याही सीजनमध्ये इतके षटकार ठोकले गेले नाहीत. या सीजनमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याची नोंद करण्यात आली होती. आयपीएल २०१८ मध्ये एकूण ८७२ षटकार ठोकले होते. पण आयपीएल २०२२ मध्ये हा षटकारांचा विक्रम मोडण्यात आला.

IPL च्या एकाच सीजनमध्ये सर्वात जास्त षटकारांचा विक्रम

IPL 2022 – 1062 षटकार

IPL 2018 – 872 षटकार

IPL 2019 – 784 षटकार

IPL 2020 – 731 षटकार

IPL 2012 – 731 षटकार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kings eleven punjab team batsman liam livingstone smashes 1000th six in ipl 97 meter six sets record in ipl 2022 nss
First published on: 25-03-2023 at 12:57 IST