गंभीर-सेहवाग जोडीचे संघात पुनरागमन होऊ शकते

भारतीय संघाच्या निवडसमितीचे माजी अध्यक्ष किरण मोरेंनी व्यक्त केली शक्यता भारतीय संघात शिखर धवन आणि रोहीत शर्मा ही नवी सलामीजोडी सध्या उत्कृष्ट खेळत असली तरी, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचे संघात केव्हाही पुनरागमन होऊ शकते असे

भारतीय संघाच्या निवडसमितीचे माजी अध्यक्ष किरण मोरेंनी व्यक्त केली शक्यता
भारतीय संघात  शिखर धवन आणि रोहीत शर्मा ही नवी सलामीजोडी सध्या उत्कृष्ट खेळत असली तरी, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचे संघात केव्हाही पुनरागमन होऊ शकते असे  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) भारतीय संघ निवडीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी स्पष्ट केले.
किरण मोरे म्हणाले,”सध्या भारतीय क्रिकेटमध्ये संघात स्थान मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. जो उत्तम कामगिरी करेल त्याला भारतीय संघात स्थान मिळविणे शक्य होते. सध्याच्या संघात कोणत्याही खेळाडूची कामगिरी खालावली तर गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग तसेच जहीर खानचे सुद्धा संघात पुनरागमन होऊ शकते यात काही शंका नाही. कारण, चांगल्या कामगिरीबरोबर संघाला अनुभवाचीही गरज असते. असेही मोरे यांनी स्पष्ट केले.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kiran more wary of confining gambhir sehwag to history