येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टी २० आणि एकदिवसीय संघाची निवड केली. टी २० संघामध्ये किरण नवगिरे या नवोदित खेळाडूला संधी देण्यात आली आहे. जर तुम्ही क्रिकेटचा एकही सामना आणि बातमी न चुकता बघणारे क्रिकेट चाहते असाल तर कदाचित तुम्हाला किरण नवगिरे हे नाव ओळखीचे असेल. ही तिच किरण आहे, जिने टी २० क्रिकेटमध्ये १५० धावा फटकावण्याची किमया केली होती.

भारतीय संघात निवड झालेली किरण प्रभू नवगिरे ही मूळची महाराष्ट्रातील सोलापूरची आहे. तिचे कुटुंब शेतकरी आहे. महेंद्रसिंह धोनीची चाहती असलेल्या किरणचा क्रिकेटपटू होण्यापर्यंतचा प्रवास फार रंजक आहे. शालेय आणि महाविद्यालयीन काळात किरण एक मैदानी खेळाडू होती. तिने २०११-१२ आंतर-विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेले आहे. याशिवाय विविध अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये तिने सुमारे १०० पदकांची कमाई केलेली आहे. क्रिकेटला तिने कधीच प्राधान्य दिले नव्हते.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

हेही वाचा – Jhulan Goswami Retirement: ‘चकडा एक्सप्रेस’ घेणार निवृत्ती? ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळणार शेवटचा सामना

किरणचे प्रशिक्षक गुलजार शेख यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये वयाच्या २२व्या वर्षी तिने क्रिकेटमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. शेख म्हणाले, “ती पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीमध्ये विद्यापीठ स्पर्धेसाठी आली होती. त्यावेळी ती गंमत म्हणून क्रिकेट खेळत होती. मी तिला षटकार मारताना पाहिले. तिच्यातील क्षमता बघून मी थक्क झालो. मी आणि आमचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांनी तिच्या क्रिकेट क्लबची चौकशी केली. तिचे उत्तर ऐकून आम्हाला आणखी एक धक्का बसला.”

किरणने गुलजार शेख यांना दिलेल्या माहितीनुसार, ती फक्त मज्जा म्हणून क्रिकेट खेळत होती. तिला क्रिकेट खेळण्यामध्ये विशेष रस नव्हता. तिच्यामते, क्रिकेट हा फार महागडा खेळ आहे. त्याऐवजी तिला अॅथलेटिक्समध्ये काहीतरी करून दाखवायचे होते. प्रशिक्षकांनी तिचा सर्व खर्च उचलण्याचे ठरवले. त्यानंतर तिने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा – IND vs ZIM 2nd ODI: “काय वेड्यासारखे निर्णय घेतो आहे?” केएल राहुलवर संतापले क्रिकेट चाहते

सोलापूरमधून पोहचली नागालँडला

२०१६-१७ मध्ये, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्षिक स्पर्धेत किरण खेळली. तिथे तिने पाच सामन्यांत ४२९ धावा केल्या. २०१७ मध्ये, तिची महाराष्ट्र संघात निवड झाली. परंतु, तिने नागालँडला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा ठरला. २०२२मध्ये, वरिष्ठ महिला टी २० ट्रॉफीमध्ये तिने नागालँडच्या संघाकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध ७६ चेंडूत १६२ धावा फटकावल्या होत्या. टी २० सामन्यात १५०पेक्षा जास्त धावा करणारी ती एकमेव भारतीय पुरुष किंवा महिला क्रिकेटपटू आहे.

वुमन्स टी २० चॅलेंज स्पर्धा

किरणच्या अंगात उत्तुंग षटकार खेचण्याची अचाट क्षमता आहे. तिच्या याच क्षमतेमुळे तिची महिला टी २० चॅलेंजमध्ये निवड झाली. या स्पर्धेतील एका सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना किरणने ४३ चेंडूत पाच षटकार आणि पाच चौकारांसह ६९ धावा केल्या होत्या.

किरणच्या क्षमतेबद्दल बोलताना प्रशिक्षक शेख म्हणाले, “ती एक नॅचरल पॉवर हिटर आहे. लहाणपणी शेतात काम केल्यामुळे तिच्या अंगात कदाचित फार ताकद आहे. त्यामुळेच ती विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करू शकली. ती महेंद्रसिंह धोनीची फार मोठी चाहती आहे. दररोज सराव करताना ती धोनीने २०११ विश्वचषकामध्ये मारलेल्या षटकाराचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करायची.”

प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला टी २० चॅलेंजनंतर किरणच्या आयुष्यात अनेक बदल झाले. ती क्रिकेटचा गांभीर्याने विचार करू लागली. क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी नियमित सरावाची आणि शिस्तीची गरज असल्याची जाणीव किरणला झाली. आता तिची थेट भारतीय संघात निवड झाली आहे. मिळालेल्या संधीचा ती कसा फायदा करून घेते, हे येणारा काळच सांगेल.