scorecardresearch

Pro Kabaddi League : मोक्याच्या क्षणी यूपी योद्धानं मारली मुसंडी..! पुणेरी पलटणचा आणखी एक पराभव

यूपी योद्धानं पुणेरी पलटणचा ५०-४० असा पराभव केला.

KL 202122 Puneri Paltan vs UP Yodha Latest Score

प्रो कबड्डी लीगच्या (PKL) ६०व्या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणचा ५०-४० असा पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह यूपी योद्धाचा संघ ३३ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला असून पुणेरी पलटणचा संघ २१ गुणांसह गुणतालिकेत अजूनही १०व्या स्थानावर आहे.

यूपी योद्धा आणि पुणेरी पलटणच्या सामन्यात ४ खेळाडूंनी सुपर १० पूर्ण केले. सुरेंदर गिल (२१), परदीप नरवाल (१०), अस्लम इनामदार (१६) आणि मोहित गोयत (११) यांनी सुपर १० मध्ये स्थान मिळवले. या सामन्यात गिलने ५ मल्टी पॉइंट्स मिळवले. या सामन्यात दोन्ही संघांनी ९० गुण मिळवले आणि या हंगामात एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर झाला आहे.

पूर्वार्धानंतर दोन्ही संघांमधील स्कोअर २०-२० असा बरोबरीत होता. परदीप नरवालने सामन्याची जबरदस्त सुरुवात केली आणि त्याने पहिल्याच चढाईत सुपर रेड टाकताना तीन गुण मिळवले. दरम्यान, पुणेरी पलटण रेडर्सना (अस्लम इमानदार आणि मोहित गोयत) त्यांच्या रेडमध्ये गुण मिळाले. पुणेरी पलटण लवकरच यूपी योद्धाच्या अगदी जवळ आले. सातव्या मिनिटाला यूपी योद्धा प्रथमच ऑलआऊट झाला. परदीपच्या जबरदस्त सुरुवातीनंतरही यूपीचा संघ झटपट ऑलआऊट झाला. पुणेरी पलटणचा बचाव करताना सुरेंदर गिल आणि परदीप नरवाल बाद झाले. श्रीकांत जाधवनेही परदीप नरवालला पुनरुज्जीवित करत दोन रेड टाकले. जाधव यांच्यानंतर सुरेंदर गिलनेही सुपर रेड करताना तीन गुण मिळवले. यूपी योद्धाने जबरदस्त पुनरागमन केले आणि १३व्या मिनिटाला पुणेरी पलटणला ऑलआऊट केले. मात्र, पूर्वार्धानंतर एकाही संघाला आघाडी मिळाली नाही आणि सामना बरोबरीत राहिला.

हेही वाचा – सौरव गांगुली BCCIच्या अध्यक्षपदावरून हटणार? जाणून घ्या कारण

उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच यूपी योद्धाने परदीप नरवालला पुनरुज्जीवित केले. यानंतर सुरेंदर गिलने सुपर रेड करताना ४ गुण मिळवले आणि सुपर १० देखील पूर्ण केला. सामन्याच्या २५व्या मिनिटाला यूपी योद्धाने पुणेरी पलटणला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले. सुरेंदर गिलने आपला दमदार फॉर्म सुरू ठेवत पुणेरी पलटणवर दडपण आणण्यासाठी दोन गुण मिळवले. दरम्यान, परदीप नरवालनेही सलग दुसरे सुपर १० पूर्ण केले. युपी योद्धाने तिसऱ्यांदा पुणेरी पलटणला ३०व्या मिनिटाला ऑलआऊट केले. पुणेरी पलटणच्या खराब बचावामुळे दुसऱ्या हाफमध्ये संघाची कामगिरी खूपच खराब झाली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kl 202122 puneri paltan vs up yodha latest score adn

ताज्या बातम्या