KL Rahul Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघामध्ये सुरू आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात केएल राहुलच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने ४६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. राहुल शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने ६७ चेंडूत १६ चौकार आणि ९ षटकारांचा साहाय्याने नाबाद १५२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
आयपीएलच्या १९ हंगामात सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलने पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरूद्ध खेळताना नाबाद १७ धावांची खेळी केली होती. केएल राहुलकडे हा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. पण त्याची ही संधी थोडक्यात हुकली. केएल राहुल १५२ धावांवर नाबाद राहिला. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रेंडन मॅक्क्लूलमच्या नावे दुसरी सर्वात मोठी खेळी करण्याची नोंद आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध झालेल्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. तर चौथ्या स्थानी असलेल्या अभिषेक शर्माने १४१ धावांची खेळी केली होती. तर पाचव्या स्थानी असलेल्या क्विंटन डीकॉकच्या नावे नाबाद १४० धावा करण्याची नोंद आहे. केएल राहुल हा टी-२० क्रिकेटमध्ये १५० धावांची खेळी करणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी तिलक वर्माने मेघालय संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात १५१ धावांची खेळी केली होती.
आयपीएलमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
१७५* – ख्रिस गेल (RCB) विरुद्ध PWI, बेंगळुरू, २०१३
१५८* – ब्रेंडन मॅक्युलम (KKR) विरुद्ध RCB, बेंगळुरू, २००८
१५२* – केएल राहुल (DC) विरुद्ध PBKS, दिल्ली, २०२६
१४१ – अभिषेक शर्मा (SRH) विरुद्ध PBKS, हैदराबाद, २०२५
१४०* – क्विंटन डी कॉक (KKR) विरुद्ध LSG, मुंबई डीवायपी, २०२२
दिल्लीने उभारला २६४ धावांचा डोंगर
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सुरूवातीला फसला, कारण पथुम निसांका अवघ्या ११ धावांवर माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणाने मिळून पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून २०० धावा जोडल्या. यादरम्यान केएल राहुलने ९१ धावा केल्या. तर केएल राहुल १५२ धावांवर नाबाद राहिला. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कुठल्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वात मोठी खेळी ठरली. दिल्लीने २० षटकांअखेर २ गडी बाद २६४ धावा केल्या.
