भारतीय क्रिकेटपटू विविध कारणांमुळे चर्चेत असतात. करोना काळात दिलेले योगदान असो वा इतर संस्थांना दिलेली देणगी असो, क्रिकेटपटू नेहमी आपल्याकडील संपत्तीचा उपयोग अनेकांच्या मदतीसाठी करत असल्याचे आपण पाहिले आहे. आता असेच एक उदाहरण केएल राहुलच्या रुपात समोर आले आहे.

मुंबईतील ११ वर्षीय नवोदित क्रिकेटर वरदला रक्ताच्या अज्ञात आजाराने ग्रासले होते. ज्यांना डॉक्टरांनी तात्काळ बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी (बीएमटी) करण्याचा सल्ला दिला होता. उपचारासाठी ३५ लाख रुपये खर्च आला. अशा परिस्थितीत केएल राहुल सप्टेंबर वरदसाठी देवदूत बनून आला, त्याने ३१ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!

वरद नलावडेचे वडील सचिन हे विमा एजंट आहेत. भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचे वरद स्वप्न पाहतो आहे. वरदची आई गृहिणी आहे. दोघांनीही आपल्या मुलाच्या उपचारासाठी निधी उभारणी मोहीम सुरू केली. त्यांना चार लाख रुपये ऑनलाइन मिळाले होते. बाकीचे काम राहुलने केले. याविषयी केएल सांगतो, ”जेव्हा मला वरदच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा माझ्या टीमने गिव्हइंडियाशी संपर्क साधला जेणेकरून आम्ही त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकू. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे.”

हेही वाचा – “दीर्घ श्वास घे आणि…”, पत्रकार धमकीप्रकरणी वीरेंद्र सेहवागचा वृद्धिमान साहाला सल्ला!

प्लास्टिक अॅनिमिया हा एक दुर्मिळ आजार आहे, जो रक्तामध्ये होतो. वरदमध्ये प्लेटलेट्स खूप कमी होत्या, ज्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. सामान्य तापही बरा व्हायला काही महिने लागले. वरदला वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया हाच एक इलाज होता. वरदच्या आईने हात जोडून राहुलचे आभार मानले. “वरदच्या शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठी रक्कम देणाऱ्या केएल राहुलचे आम्ही आभारी आहोत, पण इतक्या कमी वेळात बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे त्याच्यासाठी अशक्य होते. धन्यवाद राहुल”, असे वरदच्या आईने म्हटले.