KL Rahul Nitish Rana Partnership IPL 2026: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो केएल राहुल आणि नितीश राणा यांच्या फलंदाजीच्या कामगिरीमुळे पूर्णपणे योग्य ठरला. त्यांनी एकत्र येऊन ९५ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची भागीदारी करत १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. ४४ चेंडूंमध्ये शानदार ९१ धावा करून नितीश राणा बाद झाला आणि ही भागीदारी तुटली.

या सामन्यापूर्वी, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी कोणत्याही विकेटसाठीच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर होता. यो दोघांनी २०११ मध्ये १४६ धावांची भागीदारी केली होती. आता, केएल राहुल आणि नितीश राणा यांनी हा विक्रम मोडून दिल्ली कॅपिटल्ससाठी कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी रचली आहे. दिल्लीसाठी सर्वात मोठी भागीदारी रचणारी जोडी बनण्याचा मान या दोघांनी मिळवला आहे. त्यांच्या २२० धावांच्या भागीदारीत राहुलने १२३ धावा, तर नितीशने ९१ धावांचं योगदान दिलं.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी

केएल राहुल आणि नितीश राणा – २२० धावा (२०२६)
वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर – १४६ धावा (२०११)
मयंक अग्रवाल आणि युवराज सिंग – १०६ धावा (२०१५)
मयंक अग्रवाल आणि श्रेयस अय्यर – १०६ धावा (२०१५)

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांची २२९ धावांची भागीदारी मोडण्यापासून केवळ १० धावा दूर राहून, केएल राहुल आणि नितीश राणा यांनी आता आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध हा विक्रम केला होता. आता राहुल आणि राणा यांनी या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

आयपीएल इतिहासातील कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली – २२९ धावा (२०१६, गुजरात लायन्स विरुद्ध)
केएल राहुल आणि नितीश राणा – २२० धावा (२०१५, पंजाब किंग्स विरुद्ध)
एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली – २१५ धावा (२०१५, मुंबई इंडियन्स विरुद्ध)
केएल राहुल आणि क्विंटन डि कॉक – २१० धावा (२०२२, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध)
साई सुदर्शन आणि शुबमन गिल – २१० धावा (२०२४, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध)