scorecardresearch

IPL मधील सर्वात मोठ्या ३ पार्टनरशिप; ‘या’ दिग्गज फलंदाजांनी रचलाय धावांचा डोंगर, कोहली-डिविलियर्स कितव्या स्थानावर?

3 Biggest Partnerships In IPL History : विराटने ५५ चेंडूत नाबाद १०९ धावा तर एबी डिविलियर्सने ५२ चेंडूत नाबाद १२९ धावांची शतकी खेळी केली होती.

Biggest Partnership Records In IPL History
'या' फलंदाजांनी रचली आयपीएलमधील सर्वात मोठी भागिदारी. (Image-Indian Express)

3 Biggest Partnerships In IPL History : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या सीजनचा थरार ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. आयपीएलच्या ट्रॉफीवर जेतेपदाची मोहोर उमटवण्यासाठी सर्व संघातील खेळाडूंनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. फलंदाजही धावांचा डोंगर उभा करण्यासाठी नेटमध्ये जोरदार सराव करताना दिसत आहेत. पण आयपीएलच्या मागील काही सीजनमध्ये दिग्गज फलंदाजांनी गोलंदाजांचा धुव्वा उडवत मैदानात धावांचा पाऊस पाडला होता. आयपीएलमध्ये आतापर्यंत फलंदाजांच्या अनेक जोड्या आहेत, ज्यांनी आक्रमक खेळी करून महत्वाची भागिदारी केली आहे. आयपीएलच्या सर्वात मोठ्या तीन पार्टनरशिपबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कोहली आणि डिविलियर्स यांनी कुटल्या २२९ धावा

आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या पार्टनरशिपचा विक्रम विराट कोहली आणि एबी डिविलियर्सच्या नावावर आहे. या दोन फलंदाजांनी आरसीबीसाठी हा कारनामा केला आहे. २०१६ मध्ये आरसीबी आणि गुजरात लायन्स यांच्यात एक सामना झाला होता. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळी करून २२९ धावांची भागिदारी रचली होती. विराटने ५५ चेंडूत नाबाद १०९ धावा तर एबी डिविलियर्सने ५२ चेंडूत नाबाद १२९ धावांची शतकी खेळी केली होती. या धावांच्या जोरावर आरसीबीने तीन विकेट्स गमावत २४८ धावा केल्या होत्या.

नक्की वाचा – IPL मध्ये भोपळाही फोडला नाही! १४ वेळा शून्यावर झाले बाद; ‘या’ दोन दिग्गज फलंदाजांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

आयपीएलमधील दूसऱ्या सर्वात मोठ्या भागिदारीचा विक्रम कोहली आणि डिविलियर्सच्या नावावरच आहे. दोन्ही फलंदाजांनी २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या विरोधात धडाकेबाज खेळी केली होती. याचदरम्यान, डिविलियर्सने ५९ चेंडूत १३३ धावा कुटल्या होत्या. आयपीएलची तिसरी सर्वात मोठी भागिदारी के एल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या नावावर आहे. दोन्ही फलंदाजांनी २०२२ मध्ये केकेआरच्या विरुद्ध २१० धावांचा डोंगर रचला होता. आयपीएल इतिहासात पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागिदारी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 15:31 IST

संबंधित बातम्या