IPL History News Update : जगातील सर्वात मोठी क्रिकेट प्रीमियर लीग आयपीएलच्या १६ व्या सीजनची सुरुवात ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. या टूर्नामेंटचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात अनेक संघांनी चमकदार कामगिरी करून विजय संपादन केलं आहे. तर काही संघांना पराभवाचा सामनाही करावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त ६ संघ चॅम्पियन बनले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने सर्वात जास्त पाच जेतेपदांवर शिक्कमोर्तब केलं आहे. विजयासोबत पराभव झालेल्या संघाबद्दलही माहिती देणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊयात त्या ५ संघांबाबत ज्यांना सर्वात जास्त वेळ पराभवाचा सामना करावा लागला. १) दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त पराभव झाल्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर आहे. दिल्लीच्या संघाने आयपीएल इतिहासात एकूण २२४ सामने खेळले असून ११८ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तसंच दिल्लीच्या संघाला आयपीएलचा किताब एकदाही जिंकता आला नाही. पण दिल्लीचा संघ वर्ष २००८,२००९,२०१९,२०२० आणि २०२१ मध्ये प्ले ऑफ मध्ये पोहोचला होता. नक्की वाचा - IPL मध्ये ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंनी एकही षटकार ठोकला नाही; नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क २) पंजाब किंग्ज अभिनेत्री प्रिती झिंटाची पंजाब किंग्ज आयपीएलमध्ये अपयश मिळालेली दुसरी टीम आहे. याआधी या टीमचं नाव पंजाब किंग्ज इलेव्हन असं होतं. आयपीएल इतिहासात पंजाबला ११६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब टीमचा आयपीएलमध्ये विनिंग प्रतिशत ४५.६२ एवढं राहिलं आहे. या सीजनमध्ये पंजाब टीमची कमान शिखर धवनकडे असणार आहे. या टीमने फक्त दोनदा प्ले ऑफ मध्ये जागा मिळवली आहे. ३) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विराट कोहली, एबी डी वीलियर्स, ख्रिस गेलसह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली बंगळुरुची टीम प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये जलवा दाखवते पण एकदाही त्यांना जेतेपदावर शिक्कामोर्तब करता आलं नाही. या टीमचे विनिंग पर्सेंटेजही कमी आहेत. टीमने एकूण २२७ सामने खेळले आहेत. त्यापैकी ११३ सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला आहे. तसंच आतापर्यंत एकूण तीनवेळा या टीमने प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. ४) कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सने दोनवेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर जेतेपदाचं नाव कोरलं आहे. पण या टीमचा पराभवाचं पर्सेंटेजही खूप जास्त आहे. ते या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाता टीमने आतापर्यंत एकूण २२६ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १०६ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. टीमचं विनिंग पर्सेंटेज ५० आहे. ५) मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. पण या संघांचा अनेक सामन्यांत पराभवही झाला आहे. पराभवाच्या यादीत मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सने २३१ सामने खेळले असून ९८ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आयपीएल इतिहासात सर्वात जास्त सामने खेळण्यात मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानावर आहे.