World Cup 2023 Matches Venue In India : भारतात एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा थरार रंगणार असून क्रिकेटच्या या मोठ्या टूर्नामेंटच्या तारखांबाबत आणि मैदानांविषयीची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. विश्वचषकाचे सामने कोणत्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती बीसीसीआयच्या हवाल्याकडून जाहीर करण्यात आली आहे. एकदिवसीय विश्वचषकाचे सामने कोणत्या तारखेला खेळवले जाणार आहेत, याबाबतही खुलासा करण्यात आला आहे. ईसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार यंदा भारतात होणारा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतातील १२ शहरांमध्ये या विश्वषकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

विश्वचषकाच्या सामन्यांसाठी भारतातील १२ शहरांतील मैदानांची निवड करण्यात आली आहे. या १२ शहरांमध्ये बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, धरमशाला,गुवाहाटी, हैद्राबाद,कोलकाता, लखनऊ,इंदौर,राजकोट आणि मुंबई यांचा समावेश आहे. या विश्वचषकात एकूण ४८ सामने खेळवण्यात येणार असून यामध्ये तीन नॉकआऊट सामन्यांचा समावेश आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
IPL 2024 CSK vs GT Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
CSK vs GT Match Preview: शुबमन गिल वि ऋतुराज गायकवाड, चेपॉकच्या मैदानावर युवा कर्णधारांमध्ये मुकाबला; अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

४६ दिवस या विश्वचषकाच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. दहा वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी भारताने जिंकली नाही. त्यामुळे यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी भारताचे खेळाडू कंबर कसत आहेत. २०११ मध्ये भारताने विश्वचषकाच्या विजेत्यापदावर शिक्कामोर्तब केला होता. त्यामुळे १० वर्षानंतर होणाऱ्या या एकदिवसीय विश्वचषकावर टीम इंडिया पुन्हा एकदा नाव कोरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नक्की वाचा – IND vs AUS 3rd ODI : चेन्नईत मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ सज्ज, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु असून आज चेन्नईत अंतिम सामना खेळवला जात आहे. आगामी होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असणारी मालिका जिंकणे आवश्यक आहे. खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी वाढण्यासाठी या मालिकेवर जेतेपदाचं शिक्कामोर्तब करणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यंदाच्या विश्वचषकासाठी टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार असून हे विश्वचषक जिंकण्यासाठी सर्व खेळाडू शर्थीचे प्रयत्न करतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. या विश्वचषकाआधी ७ जून ते ११ जून दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे.