scorecardresearch

IPL History : आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी शतक ठोकून रचला इतिहास; ‘या’ फलंदाजाच्या नावावर सर्वाधिक शतकांची नोंद

आयपीएल इतिहासात एकूण ४० फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. जाणून घेऊयात या फलंदाजांबाबत सविस्तर माहिती.

Most Centuries In IPL History
या फलंदाजांनी IPL मध्ये केली शतकी खेळी. (Image-Indian Express)

Most Centuries In IPL History : यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या सीजनचा थरार ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. गुजरात टायटन्स आणि सीएसके यांच्यात पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पुर्वी आम्ही तुम्हाला आयपीएल इतिहासात ज्या खेळाडूंनी सोनेरी पानाची मोहोर उमटवली आहे, त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. आयपीएलमध्ये आतापर्यंत विराट कोहलीपासून ख्रिस गेलपर्यंत अनेक फलंदाजांनी शतक ठोकलं आहे. तसंच कोणत्या फलंदाजाच्या नावावर सर्वाधिक शतकांची नोंद करण्यात आलीय, याबद्दलही तुम्हाला सांगणार आहोत.

आयपीएलमध्ये या खेळाडूंनी ठोकले शतक

आयपीएल इतिहासात एकूण ४० फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. या लिस्टमध्ये कॅप्ड फलंदाजांसोबतच अनकॅप्ड फलंदाजांचाही समावेश आहे. या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव ख्रिस गेलचं आहे. गेलने आयपीएलमध्ये ६ शतक ठोकले आहेत. त्यानंतर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने आतापर्यंत आयपीएल करिअरमध्ये ५ शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. तर जॉस बटलरनेही ५ शतक ठोकले असून तो या लिस्टमध्ये विराटसोबत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तसंच डेविड वॉर्नर, केएल राहुल आणि शेन वॉटसनने आयपीएलमध्ये ४-४ शतक ठोकले आहेत. तर एबी डिविलियर्स आणि संजू सॅमसनच्या नावावर ३ शतके आहेत.

नक्की वाचा – RCB विरुद्ध ठोकले ६ चेंडूत ६ चौकार; भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंची खास विक्रमाला गवसणी, IPL इतिहासात नोंद

शिखर धवन, अजिंक्य रहाणे, ब्रॅंडन मॅक्कुलम, क्विंटन डिकॉक, विरेंद्र सेहवाग, मुरली विजय, एडम गिलक्रिस्ट, बेन स्टोक्स आणि हाशिम आमलाच्या नावावर दोन शतके आहेत. याशिवाय रोहित शर्मा, सुरेश रैना, अंबाती रायडू, मनीष पांडे, यूसुफ पठाण, ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ, शॉर मार्श, डेविड मिलर, ऋद्धीमना साहा, सचिन तेंडुलकर, मयंक अग्रवाल, मायकल हसी, जॉनी बेयरस्टो,देवदत्त पड्डीकल, ऋतुराज गायकवाड, महेला जयवर्धने, लिंडन सिमन्स, कीवन पीटरसन, एंड्य्रू सायमंड्स, सनथ जयसूर्या, पॉल वल्थाटी आणि रजन पाटीदार यांच्या नावावर १-१ शतक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 13:54 IST

संबंधित बातम्या