scorecardresearch

Premium

World Cup 2023: भारत आणि इंग्लंड संघात आज रंगणार सराव सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह स्ट्रिमिंग

World Cup 2023 Warm-up Match: आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे दुपारी दोनपासून खेळला जाईल.

World Cup 2023 Updates
भारत आणि इंग्लंड संघात रंगणार आज सराव सामना (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

India vs England Practice Match Updates: एकदिवसीय विश्वचषका २०२३ चा बिगुल लवकरच वाजणार आहे. क्रिकेटचा हा महाकुंभ ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, मात्र सराव सामने शुक्रवारपासून सुरू झाले आहेत. आता शनिवारी (३० सप्टेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते आणि सामना कुठे पाहता येणार ते जाणून घेऊया.

या सामन्यात, दोन्ही संघ त्यांच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह बाहेर पडून विश्वचषकाच्या तयारीला अंतिम रूप देऊ शकतात. या दोन्ही संघांना विश्वचषकासाठी आपले सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्याची ही उत्तम संधी आहे. हा सामना भारतासाठी देखील महत्त्वाचा आहे. कारण तो आपल्या जवळपास अंतिम अकरा खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. ज्यांना आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड गिल, कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह या अकरा खेळाडूंना पहिली संधी देऊ इच्छित आहेत.

World Cup 2023 IND vs AUS Match Updates
World Cup 2023, IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रिडीक्शनसह, जाणून घ्या सर्व काही
19th asian games 2023 updates
Asian Games: भारत-बांगलादेश सेमीफायनल सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Australia vs Netherlands Practice Match in World Cup 2023
AUS vs NED: ऑस्ट्रेलियन संघ राजकोटच्या उष्णतेतून थेट पोहोचला केरळच्या सुंदर वातावरणात, वॉर्नरने शेअर केला VIDEO
India Vs Australia 2nd ODI in Indore
IND vs AUS 2nd ODI: इंदूरमध्ये दोन्ही संघांसाठी आश्चर्यकारक योगायोग! जाणून घ्या होळकर स्टेडियमवरील भारताचा वनडे रेकॉर्ड

या सामन्याद्वारे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांचीही कसोटी इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांचा कर्णधार जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स यांच्यासमोर होणार आहे. कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचीही चाचणी होणार आहे. सर्व गोलंदाजांना काही षटके टाकण्याची संधी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – Criiio 4 Good: आता मुली क्रिकेटमधून शिकणार जीवनकौशल्य; शिक्षण मंत्रालय, आयससीसह युनिसेफने घेतला पुढाकार

त्याचबरोबर अष्टपैलू बेन स्टोक्सचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. या विश्वचषकासाठी निवृत्ती मागे घेऊन तो संघात परतला असून त्याला या सराव सामन्यात खेळायला नक्कीच आवडेल. संघाचा कर्णधार जोस बटलर आहे. या संघात स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली आणि सॅम करनसारखे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत.

भारत-इंग्लंड सामना पावसामुळे वाया जाऊ शकतो?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुवाहाटीमध्ये ३० सप्टेंबरला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. वेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, शनिवारी गुवाहाटीमध्ये पावसाची ५०-५५ टक्के शक्यता आहे.

भारत-इंग्लंड सामना लाइव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सराव सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स हिंदीवर चाहत्यांना हा सामना पाहता येईल. तसेच ऑनलाइन सामना पाहणारे दर्शक डिस्ने हॉट स्टारवर हा सामना पाहू शकतात.

हेही वाचा – World Cup 2023: आयसीसीने समालोचन पॅनेलची केली घोषणा केले, सहा भारतीयांसह ३१ सदस्यांना मिळाले स्थान

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know everything about the india vs england warm up match ahead of the world cup 2023 vbm

First published on: 30-09-2023 at 09:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×