scorecardresearch

Asian Games Cricket Schedule: टीम इंडिया थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार, जाणून घ्या महिला आणि पुरुष संघाचे वेळापत्रक

Asian Games 2023 Updates: आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे. भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळतील.

Asian Games 2023 Cricket Schedule
आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेतील भारतीय महिला आणि पुरुष संघ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Asian Games 2023 Cricket Schedule: आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेला मंगळवारपासून सुरूवात होत आहे. यामध्ये २७ सप्टेंबरपासून पुरुष क्रिकेटला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार असून हा टी-२० फॉरमॅट असणाप आहे. याआधी ९ सामने खेळवले जाणार आहेत. गटातील सामने जिंकणाऱ्या संघांना गुणांच्या आधारे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळेल. भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीचा सामना ३ ऑक्टोबरला खेळणार आहे. तर पाकिस्तानचा सामनाही ३ ऑक्टोबरलाच होणार आहे. भारतीय महिला संघ २१ सप्टेंबरला सामना खेळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीसाठीही ती मैदानात उतरणार आहे.

महिला संघाचे वेळापत्रक –

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमधील पहिला सामना इंडोनेशिया आणि मंगोलिया यांच्यात होणार आहे. तसेच टीम इंडिया थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. भारतासोबतच पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेचे संघही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. भारतीय महिला संघाचा सामना २१ सप्टेंबरला आहे. त्याच दिवशी पाकिस्तानचा सामनाही होणार आहे. भारतीय महिला संघ जिंकल्यास २४ सप्टेंबर रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळेल. यानंतर २५ सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…

पुरुष संघाचे वेळापत्रक –

२७ सप्टेंबरपासून पुरुष क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामध्ये पहिला सामना नेपाळ आणि मंगोलिया यांच्यात होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचा उपांत्यपूर्व सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्येही भारतासह पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पुरुष क्रिकेटचा उपांत्य सामना ६ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. त्याचा अंतिम सामना ७ ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताची कमान ऋतुराज गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकासाठी खास पाहुण्यांच्या यादीत रजनीकांत यांचा समावेश, जय शाहांनी दिले ‘Golden Ticket’

आशियाई खेळ २०२३ क्रिकेट भारतात कोठे पाहायचे?

आशियाई खेळ २०२३ क्रिकेटचे थेट प्रक्षेपणन सोनी लीव्वेह बसाइट आणि अॅपवर उपलब्ध असेल. आशियाई खेळ २०२३सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग, आकाश दीप.

राखीव: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन

भारतीय महिला क्रिकेट संघ: हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनुषा बारेड्डी.

हेही वाचा – IND vs SL: ‘त्या सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक…’; भारत-श्रीलंका सामन्यांवर आरोप करणाऱ्यांना सुनील गावसकरांचा टोला

राखीव: हरलीन देओल, काश्वी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 17:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×