Mumbai Indian in IPL Points Table: लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशा काहीशा कमी झाल्या आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स स्पर्धेत टिकून राहणार की बाहेर पडणार हा प्रश्न विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुणतालिकेतील मुंबई इंडियन्सचं स्थान काय, आगामी सामन्यांचा या गुणतालिकेवर काय परिणाम होणार? नेट रन रेटची भूमिका किती आणि नेमकं नेट रन नेट म्हणजे काय आणि मुंबई इंडियन्स स्पर्धेत टिकून राहणार की बाहेर पडणार याचा हा आढावा.

मुंबईचा संघ शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील. अशा स्थितीत त्यांचं स्पर्धेतील स्थान इतर संघाच्या जयपराजयावर अवलंबून असेल. याचं कारण म्हणजे त्यांचा सरासरी नेट रनरेट हा -०.१२८ इतका आहे. आतापर्यंत त्यांना १३ सामन्यात ६ पराभवांचा सामना करावा लागला, तर ७ सामन्यात ते विजय झाले. यासह ते गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.

Why Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Called El Classico
IPL 2024: चेन्नई सुपर किंग्स वि मुंबई इंडियन्सच्या सामन्याला El Classico का म्हणतात? जाणून घ्या
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य

लखनऊ सुपर जायंट्सचे १३ सामन्यांत १५ गुण झाले आहेत. त्यांचा नेट रनरेट हा +०.३०४ आहे. आयपीएल २०२३ मध्ये गतविजेता गुजरातने १३ सामन्यांत १८ गुण मिळवत सर्वात आधी प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले. चेन्नई सुपर किंग्जने १३ सामन्यांत १५ गुण मिळवत तालिकेत दुसरं स्थान पटकावलं. त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.

नेट रन रेटची तोंड ओळख…

नेट रन रेट म्हणजेच गुणतालिकेमध्ये एनआरआर या मथळ्याखाली सामान्यपणे सर्वात उजवीकडे दिसणारे आकडे असं सांगितल्यास लगेच उणे किंवा अधिकमधील आकडेवारी तुमच्या डोळ्यासमोर येईल. मागील अनेक दशकांपासून ही पद्धत सामान्यपणे दोन किंवा तीनहून अधिक संघ खेळत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामाना अनिर्णित राहिला किंवा पुढील फेरीसाठी संघांना पात्र अपात्र ठरवण्यासाठी वापरली जाते. अनेकदा या नेट रन रेटच्या आधारावर संघांची वाटचाल अवलंबून असते. खास करुन विश्वचषक किंवा जागतिक कसोटी मालिकेसारख्या स्पर्धांमध्ये या नेट रन रेटचा फार मोठा वाटा असतो. अनेकांना हा काय प्रकार असतो हे कळत नाही, पण तसं याचं गणित फार सोप्प आहे.

कसं ठरतं नेट रन रेट?

संघाच्या निव्वळ धावगतीचा दर म्हणजेच नेट रन रेट हा संपूर्ण स्पर्धेचा विचार करुन ठरवला जातो. एखाद्या संघाने संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक षटकामध्ये केलेल्या सरासरी धावांमधून त्या संघाविरुद्ध प्रति षटक सरासरी किती धावा करण्यात आल्या हे वजा करून मोजला जातो.

पूर्ण षटकं खेळण्याआधीच संघ बाद झाला तर काय?

एखाद्या सामन्यामध्ये संपूर्ण षटकं न खेळताच पूर्ण संघ तंबूत परला तर अशा स्थितीमध्ये नेट रन रेट हे संपूर्ण षटकांचा विचार करुन मोजला जातो. म्हणजेच २० षटकांच्या सामन्यामध्ये एखादा संघ १५ षटकांमध्येच बाद झाला तरी नेट रन रेट मोजताना संपूर्ण २० षटकं ग्राह्य धरली जातात. तो संघ किती षटकांमध्ये बाद झाला हे अशावेळी नेट रन रेट मोजताना ग्राह्य धरलं जात नाही.

कोणत्या सामन्यांचं नेट रन रेट काढलं जात नाही?

ज्या सामन्यांचा पूर्ण निकाल लागतो त्याच सामन्यांचा नेट रन रेट मोजला जातो. ज्या सामन्यांचा निकाल लागत नाही म्हणजेच जे अनिर्णित राहतात त्यांचा विचार नेट रनरेटमध्ये केला जात नाही. गुण वाटून दिले तरी त्याचा फरक नेट रन रेटवर पडत नाही. तो आधीच्या सामन्यांनुसार ग्राह्य धरला जातो. जेव्हा सामना रद्द केला जातो, परंतु डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जातो त्यावेळी एनआरआर मोजण्यासाठी दुसऱ्या टीमनं खेळ थांबला त्यावेळेपर्यंत झालेल्या षटकांमध्ये किती धावा केल्या तितक्या धावांचा विचार पहिल्या टीमसाठी केला जातो. सामना पूर्ण होतो, परंतु तो संपायच्या आधी डकवर्थ लुईसचा वापर केला गेला असेल, तर दुसऱ्या टीमला एकूण षटकांमध्ये ज्या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी दिलेलं असेल त्यापेक्षा एक कमी धाव पहिल्या टीमसाठी धरण्यात येते.

उदाहरणासह समजून घेऊयात…

हे अधिक योग्य पद्धतीने समजून सांगण्यासाठी १९९९ च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या नेट रन रेटचं उदाहरण घेऊयात. दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यावेळी ‘अ’ गटामध्ये होता. साखळी सामन्यांनतर दक्षिण आफ्रिकेची गुणतालिकेमधील स्थिती खालीलप्रमाणे होती…

एकूण सामने – ३
विजयी सामने – ३
पराभूत सामने- ०
अनिर्णित सामने – ०
एकूण गुण – ६
नेट रन रेट – +१.४९५
ग्राह्य षटकं आणि धावा (फॉर) – ६७८/१४७.२
ग्राह्य षटकं आणि धावा (अगेन्स्ट) – ४६६/१५०

या वरच्या आकडेवारीमध्ये तीन महत्त्वाचे आकडे म्हणजे नेट रन रेट, फॉर आणि अगेन्स्टची आकडेवारी. यामधील नेट रन रेटची आकडेवारी ही अगेन्स्टमधील भागाकारामधून आलेल्या उत्तराला फॉर समोरील भागाकारातून आलेल्या उत्तरातून वजा केल्यानंतर मिळाली. आता हे सविस्तरपणे समजून घेऊयात.

फॉर म्हणजे काय?

दक्षिण आफ्रिकेने तीन संघांविरुद्ध खेळताना केलेल्या धावांची ही आकडेमोड आहे. या तक्त्यामधील आकडेवारी ही भारत, श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतरची आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने कशी कामगिरी केलेली पाहूयात…

भारताविरुद्ध – ६ गडी बाद २५४ धावा (४७.२ षटकांमध्ये)
श्रीलंकेविरुद्ध – ९ गडी बाद १९९ धावा (५० षटकांमध्ये)
इंग्लंडविरुद्ध – ७ गडी बाद २२५ धावा (५० षटकांमध्ये)

या तिन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकूण ६७८ धावा केल्या होत्या. यासाठी त्यांनी १४७ षटकं आणि दोन चेंडू घेतले. म्हणजेच सहा चेंडूंचं षटकं पकडलं तर १०० च्या टप्प्यात षटकं ही १४७.३३३ इतकी होतात. याचा भागाकार केल्यास म्हणजेच ६७८ भागीले १४७.३३३ चं उत्तर ४.६०२ इतकं येतं. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये दक्षिण आफ्रिकेने ४.६०२ धावा केल्या.

अगेन्स्ट म्हणजे काय?

दक्षिण आफ्रिकेवरुद्ध तिन्ही संघांनी किती धावा केल्या याची ही आकडेवारी आहे. या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघ कसे खेळले पाहूयात

भारत – ५ गडी बाद २५३ धावा (५० षटकांमध्ये)
श्रीलंका – १० गडी बाद ११० धावा (३५.२ षटकांमध्ये)
इंग्लंड – १० गडी बाद १०३ धावा (४१ षटकांमध्ये)

हेही वाचा : वडील आयसीयूमध्‍ये, तो नुकताच दुखापतीतून सावरलेला; तरीही लखनऊच्‍या पठ्ठ्याने शेवटच्या षटकात मुंबईला चारली धूळ

यापैकी श्रीलंका आणि इंग्लंडचे संघ संपूर्ण षटकांचा खेळ होण्याआधीच बाद झाले. मात्र रन रेटचा विचार करताना या संघांनी संपूर्ण षटकांचा खेळ केला असं ग्राह्य धरलं जातं. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिस्पर्धी संघांचा रन रेट मोजताना ४६६ (२५३+ ११०+ १०३) धावा भागिले १५० (५०+ ५०+ ५०) याचं उत्तर ३.१०७ इतकं येतं. म्हणजेच प्रतिस्पर्ध्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येक षटकाला ३.१०७ धावा केल्या.

नेट रन रेट किती?

आता नेट रन रेटच्या सूत्रानुसार संघाने प्रतिस्पर्ध्याविरोधात केलेल्या धावांच्या सरासरीमधून त्या संघाविरुद्ध करण्यात आलेल्या धावांची सरासरी वजा करायची. त्यामुळेच या वरील आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिकेचं नेट रन रेट हे ४.६०२ मधून ३.१०७ वजा केल्यावर मिळणारं उत्तर म्हणजेच १.४९५ असं येईल.