या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय क्रिकेटपटू सातत्याने क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त २६ मार्च ते २९ मे या काळात जवळपास सर्वच भारतीय क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत व्यस्त होते. त्यानंतर काही वरिष्ठ खेळाडू वगळता इतर खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी २० मालिका खेळले. ही मालिका नुकतीच संपली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि श्रेयस अय्यर इंग्लंडला रवाना झाले. म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघ कमालीचा व्यस्त राहिला आहे. विशेष म्हणजे पुढील सहा महिन्यांत तरी ही स्थिती बदलणार नाही. डिसेंबर २०२२ पर्यंत भारतीय संघाचे वेळापत्रक प्रचंड व्यस्त असणार आहे.

आयर्लंड दौरा – येत्या एक-दोन दिवसांत भारताचा टी २० संघ आयर्लंडला रवाना होणार आहे. तिथे भारताला २६ आणि २८ जून रोजी दोन टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IND vs BAN T20I 2024 Starts On 28th April Women Team India Take Revenge of Harmanpreet Kaur
IND vs BAN Women’s T20I ‘या’ दिवशी होणार सुरु; २०२३ मधील ‘त्या’ वादाचा बदला घेणार का हरमनप्रीतची सेना?
IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

इंग्लंड दौरा – आयर्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर, १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळायचा आहे. हा सामना भारताने गेल्यावर्षी अर्धवट सोडलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आहे. यानंतर इंग्लंडसोबतच भारत तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामनेही खेळणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह यांच्यासह कसोटी संघातील इतर काही खेळाडू यापूर्वीच इंग्लंडला पोहोचले आहेत.

वेस्ट इंडिज दौरा – इंग्लंडनंतर भारताला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. २२ जुलैपासून तिथे पाच टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ७ ऑगस्टला ही मालिका संपेल. विशेष म्हणजे या मालिकेतील दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत.

आशिया चषक – वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेला जावे लागणार आहे. आशिया चषकाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. तरी, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक होईल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा – Video : आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाने अचानक सुरू केले क्षेत्ररक्षण!

ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार – सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार आहे. भारत तीन टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे.

टी २० विश्वचषक – ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी २० विश्वचषक आयोजित केला गेला आहे. त्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया दौरा करावा लागणार आहे. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये विश्वचषकाचे सामने होतील.

हेही वाचा – तीन भारतीय दिग्गजांचे २० जूनशी असलेले खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?

बांगलादेश दौऱ्यानंतर श्रीलंकेचा होणार पाहुणचार – टी २० विश्वचषकानंतरही भारतीय संघाला सुट्टी मिळणार नाही. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारताला बांगलादेशमध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जावे लागणार आहे. वर्षाच्या शेवटी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळवण्याचा प्रस्ताव आहे. या मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत.

बीसीसीआयचे हे नियोजन बघता येत्या सहा महिन्यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघाला उसंत मिळणार नसल्याचे दिसते. या व्यस्त वेळापत्रकादरम्यान खेळाडूंसमोर आपली फिटनेट टिकवून ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.