२६ मार्च २०२२ रोजी इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली होती. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (२९ मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आपला पहिलाच आयपीएल हंगाम खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ क्वॉलिफाय १ सामना जिंकून सर्वात अगोदर अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. तर, शुक्रवारी (२७) झालेल्या क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून राजस्थान रॉयल्सही अंतिम फेरीमध्ये दाखल झाले आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाचे विजेतपद आणि बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील.

क्रिकेटमध्ये प्रचंड पैसे आहेत, असे आजकाल म्हटले जाते. त्यामध्ये काहीही चुकीचे नाही. सध्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामध्ये आयोजक प्रचंड पैसे ओततात. कारण, क्रिकेटला असलेल्या लोकप्रियतेमुळे खर्च केलेले पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गात परत मिळतात. मग, आयपीएल तरी त्याला अपवाद कसा असेल. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आयोजित केली जाते. त्यामुळे बक्षिसाची रक्कमही तितकीच मोठी असणार याबाबत दुमत नाही. जेव्हा-जेव्हा आयपीएलची चर्चा होते तेव्हा लोकांच्या मनात बक्षिसाच्या रकमेबाबत उत्सुकता निर्माण होते.

Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

गतवर्षी जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला २० कोटी रुपये देण्यात आले होते. यावर्षीदेखील विजेत्यांना इतकीच रक्कम दिली जाणार आहे. बक्षीस रकमेत कोणताही बदल होणार नाही. मात्र, उपविजेत्या संघाला गतवर्षीच्या तुलनेत ५० लाख रुपये अधिक मिळणार आहेत. म्हणजेच यावर्षी उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये दिले जातील. तर, तीसऱ्या क्रमांकाच्या संघाला (आरसीबी) ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला (एलएसजी) ६.५ कोटी रुपये दिले जातील. यासोबतच इतर वैयक्तिक पुरस्कारांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपये दिले जाणार आहेत तर ऑरेंज कॅप व पर्पल कॅपचे मानकरी असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

२००८ मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ विजेता ठरला होता. शेन वॉर्नच्या संघाला त्यावेळी ४.८ कोटी रुपये मिळाले होते. आताची बक्षिसाची रक्कम जवळपास चौपट झाली आहे. कोट्वधी रुपयांच्या बक्षिस रकमेमुळेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी ‘लीग क्रिकेट’ स्पर्धा मानली जाते.