scorecardresearch

Premium

IND vs SL: श्रीलंकेच्या २० वर्षीय गोलंदाजाने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला लावला सुरुंग, जाणून घ्या कोण आहे दुनिथ वेल्लालगे?

Great bowling by Dunith Vellalage: भारतीय संघाची चौथी विकेट १५४ धावांच्या धावसंख्येवर पडली. लोकेश राहुल ४४ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्यालाही झेलबाद केले. आतापर्यंत या सामन्यात वेल्लालगेने पाच विकेट घेतल्या आहेत.

who is Dunith Vellalaghe
दुनिथ वेल्लालगे (फोटो-ट्वि

Dunith Vellalaghe will send Team India’s top order into the tent: मंगळवारी कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या आशिया चषक सुपर फोर सामन्यात टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या एका युवा गोलंदाजाने आपल्या करिष्माई गोलंदाजीने आश्चर्यचकित केले. २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेल्लालगेने भारतीय टॉप ऑर्डर खिंडार पाडले, परंतु दुनिथ वेल्लालगे कोण आहे जाणून घेऊया.

दुनिथ वेल्लालगेच्या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने आपल्या पहिल्या ४ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या स्टार फलंदाजांना दुनिथचा चेंडू समजू शकला नाही आणि त्यांनी आपली विकेट गमावली. दुनिथने शुमन गिल आणि रोहित शर्माला बोल्ड केले, त्यानंतर विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक झेलबाद केले. अशा प्रकारे त्याने एकट्याने टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
Mumbai vs Baroda Ranji Trophy Trophy Hardik Tamore century
हार्दिक तामोरेची शतकी खेळी
IND vs ENG 3rd Test Match Updates Yashasvi Jaiswal Retired Hurt
IND vs ENG : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे ३२२ धावांची आघाडी, ‘यशस्वी’ खेळीनंतर जैस्वाल रिटायर्ड हर्ट!
Prithvi Shaw 150 runs in Ranji Trophy cricket tournament sport
पृथ्वी शॉचे दमदार दीडशतक

रंगना हेराथनशी केली जाते तुलना –

दुनिथ वेल्लालगेची तुलना श्रीलंकेचा दिग्गज रंगना हेराथशी करण्यात केली जाते. दुनिथ हा स्लो लेफ्ट ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. विशेष म्हणजे हे वेल्लालगेचे होम ग्राउंड आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी २००३ रोजी कोलंबो येथे झाला. सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकलेल्या वेल्लालगेने अफगाणिस्तानला आशिया कपमधून बाहेर पाडण्यातही योगदान दिले होते.

हेही वाचा – IND vs SL: अर्धशतक ठोकताच रोहित शर्माची आणखी एका विक्रमाला गवसणी, ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच सलमीवीर

त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३६ धावांत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने श्रीलंका अंडर-१९ आणि श्रीलंका अ संघांसाठीही चमकदार कामगिरी केली आहे. यासोबतच त्याने लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्सकडून चमकदार कामगिरी केली आहे. तो श्रीलंकेतील स्थानिक कोल्ट्स क्रिकेट क्लबकडूनही खेळतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते वनडे पदार्पण –

वेल्लालगेने यापूर्वी कसोटी पदार्पण केले आहे. गतवर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध गॉलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात त्याने ७ षटकांत २ विकेट्स घेतले.
वेल्लालगेने याआधी १२ एकदिवसीय सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. तो कधीकधी चांगली फलंदाजीही करतो. त्याने प्रथम श्रेणीमध्ये ७८ धावांची नाबाद खेळीही खेळली आहे. विशेष म्हणजे वेल्लालाघेचा वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये स्टँडबाय पर्याय म्हणून समावेश करण्यात आला होता, परंतु त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली, त्यामुळे क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये कौतुकास पात्र ठरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know who dunith vellalaghe will send team indias top order into the tent in ind vs sl match vbm

First published on: 12-09-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×