भारतीय संघाचा युवाफलंदाज विराट कोहली हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडू शकतो असे भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी म्हटले आहे.
एका क्रिकेट सामन्याच्या उदघाटनावेळी चौहान म्हणाले की, विराट कोहलीची कामगिरी पाहता तो एकदिवसीय व कसोटीमधील सचिनचे विक्रम मोडून काढू शकतो. कोहली आणि धोनीला वगळता इतर कोणाचेही फलंदाजीत सातत्य नाही. सलामीवीर आणि मधल्याफळीतील फलंदाजी चिंतेचा विषय झाली आहे. त्यात विराट कोहली मात्र, प्रत्येकवेळी निर्णायक खेळी साकारत आहे. त्यामुळे कोहलीमध्ये सचिनचा विक्रम मोडण्याची कुवत आहे. असेही चौहान म्हणाले.
गोलंदाजीच्या बाबतीत भारताची अवस्था ढासळल्यासारखी झाली आहे. ईशांत शर्मा चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. तसेच चेतेश्वर पुजाराचा केवळ कसोटीवेळी विचार न करता एकदिवसीय सामन्यातही पुजाराला खेळवावे असे मत चौहान यांनी यावेळी व्यक्त केले.