भारताचा युवा फलंदाज विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एबीडी व्हिलियर्स यांच्या दरम्यान आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानासाठी येत्या महिन्यात चढाओढ होताना दिसणार आहे.
कोचीमध्ये येत्या २१ नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. तर दुसरीकडे २४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दरम्यानही तीन एकदिवसीय सामने आहेत. त्यामुळे या मालिकेमध्ये कोहली आणि एबीडी व्हिलियर्स या दोघांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दोघांपैकी उत्कृष्ट खेळी करणाऱयाला आयसीसी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळेल.