पहिल्या कसोटी मालिकेला सामोरे जात असताना कर्णधार विराट कोहलीने त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही, त्याने आक्रमकच राहायला हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘तुम्ही कोण आहात, हे तुम्हाला समजायला हवे. या खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकृतीचे खेळाडू यशस्वी होत असतात. या खेळामध्ये आतापर्यंत पाहिले तर आक्रमक खेळाडू अधिक यशस्वी होताना दिसतात. प्रत्येक जण आपल्यामधील आक्रमकपणा वेगळ्या पद्धतीने दाखवत असतो. त्यामुळे कोहलीने त्याच्या प्रकृतीमध्ये बदल करण्याची गरज नाही,’’ असे द्रविड म्हणाला.