Kraigg Brathwaite broke Gary Sobers Record in WI vs BAN 2nd Test : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात जमैकामध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. विंडीज संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होताच एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने महान फलंदाज गॅरी सोबर्सचा मोठा कसोटी विक्रम मोडला. खरेतर, क्रेग ब्रेथवेटने वेस्ट इंडिजसाठी सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा गॅरी सोबर्सचा ५२ वर्षांचा जुना विक्रम मोडला.

आपल्या देशासाठी सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत गॅरी सोबर्सला मागे टाकून ब्रेथवेट नंबर वन ठरला आहे. सध्याचा सामना हा ब्रेथवेटचा ८६ वा कसोटी सामना आहे. सोबर्स यांनी एप्रिल १९५५ ते एप्रिल १९७२ पर्यंत ८५ कसोटी सामने खेळले होते. डेसमंड हेन्स (७२), ब्रायन चार्ल्स लारा (६४), रोहन कन्हाई (६१), सर विव्ह रिचर्ड्स (६१) आणि कोर्टनी वॉल्श (५३) यांचाही या यादीत समावेश आहे.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
australian open 2025 novak djokovic defeats indian origin teen sensation nishesh basavareddy
तारांकितांची अपेक्षित सुरुवात; जोकोविचची भारतीय वंशाच्या निशेषवर मात; सिन्नेर, अल्कराझचेही यश

वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू :

क्रेग ब्रेथवेट – २०१४ ते २०२४ पर्यंत ८६ कसोटी
गॅरी सोबर्स – १९५५ ते १९७२ पर्यंत ८५ कसोटी
डेसमंड हेन्स – १९७९ ते १९८८ पर्यंत ७२ कसोटी
ब्रायन लारा – १९९२ ते १९९ पर्यंत ६४ कसोटी
रोहन कन्हाई – १९५७ ते १९६९ पर्यंत ६१ कसोटी
सर व्हिव्हियन रिचर्ड्स – १९८० ते १९८८ पर्यंत ६१ कसोटी
कोर्टनी वॉल्श – १९९० ते १९९७ पर्यंत ५३ कसोटी

हेही वाचा – IND vs PMXI : हर्षित राणाचा कहर! ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हनविरुद्ध अवघ्या ६ चेंडूत पटकावल्या ४ विकेट्स, पाहा VIDEO

या दिग्गजांच्या नावावर विश्वविक्रम –

कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकच्या नावावर आहे. मे २००६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत त्याने १५९ कसोटी सामने खेळले. या यादीत ॲलन बॉर्डर (१५३), मार्क वॉ (१५३), सुनील गावस्कर (१०६), ब्रेंडन मॅक्युलम (१०१) आणि नॅथन लायन (१००) ही नावे आहेत, ज्यांनी १०० किंवा त्याहून अधिक सलग कसोटी सामने खेळले आहेत.

हेही वाचा – Jay Shah : जय शाह यांनी स्वीकारली ICC च्या चेअरमनपदाची जबाबदारी, चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार?

u

केमार रोच पहिल्या दिवशी चमकला –

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात केमार रोचने वेस्ट इंडिजसाठी चमकदार कामगिरी केली. ओल्या आउटफिल्डमुळे दिवसभरात केवळ ३० षटकांचाच खेळ होऊ शकला. बांगलादेशने दोन गड्यांच्या मोबदल्यात ६९ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने सातव्या षटकात महमुदुल हसन जॉय आणि मोमिनुल हक शोभ्राच्या सुरुवातीच्या विकेट्स गमावल्या, तेव्हा संघाची धावसंख्या केवळ १० धावा होती. या दोन्ही विकेट्स केमार रोचने घेतल्या. मात्र, त्यानंतर शादमान इस्लामने १०० चेंडूत ५० धावा करत बांगलादेशची धुरा सांभाळली. त्याने शहादत हुसेन दिपूसोबत ५९ धावांची नाबाद भागीदारीही केली.

Story img Loader