Kuldeep hat trick wins India A team spinner hat trick ysh 95 | Loksatta

कुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय

‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवने हॅट्ट्रिकसह चार बळी मिळवल्यानंतर पृथ्वी शॉने (४८ चेंडूंत ७७ धावा) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारत-अ संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड-अ संघाचा चार गडी राखून पराभव केला.

कुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय
कुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय

चेन्नई : ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवने हॅट्ट्रिकसह चार बळी मिळवल्यानंतर पृथ्वी शॉने (४८ चेंडूंत ७७ धावा) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारत-अ संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड-अ संघाचा चार गडी राखून पराभव केला. यासह भारत-अ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड-अ संघाचा डाव ४७ षटकांत २१९ धावांवर आटोपला. जो कार्टरने ७२, तर रचिन रिवद्रने ६१ धावांचे योगदान दिले. कुलदीपने लोगन व्हॅन बिक (४), जॉ वॉकर (०) आणि जेकब डफी (०) यांना सलग तीन चेंडूंवर बाद करत हॅट्ट्रिक साकारली. त्याने ५१ धावांत चार गडी बाद केले. त्याला राहुल चहर आणि रिषी धवन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून सुरेख साथ केली. त्यानंतर पृथ्वीच्या तडाखेबंद खेळीमुळे भारत-अ संघाने २२० धावांचे लक्ष्य ३४ षटकांत सहा गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. पृथ्वीला ऋतुराज गायकवाड (३०), संजू सॅमसन (३७) यांची साथ मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन

संबंधित बातम्या

IND vs BAN 2nd ODI: गडी एकटा निघाला! हाताला पट्टी तरी रोहित टीम इंडियासाठी लढला, चाहत्यांचा कडक सॅल्यूट
दक्षिण आफ्रिकेहून विराटनं आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; Photo पाहून तुम्हीही म्हणाल, ‘‘किती गोड..!”
IND vs BAN 2nd ODI: रोहित शर्माची झुंज अपयशी! बांगलादेशची भारतावर ५ धावांनी मात, मालिकेत २-० विजयी आघाडी
विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?
IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ उमरान मलिकच्या १५१ किमी वेगाने फलंदाजाच्या दांड्या गुल, पाहा video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द