मुंबई : रांची येथे सुरू असलेल्या १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राने तिहेरी (फ्री-स्टाइल, ग्रीको रोमन, महिला) सांघिक जेतेपद मिळवले. महाराष्ट्राने स्पर्धेत एकूण १९ पदकांची लयलूट केली. यामध्ये सात सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्री-स्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी एकूण चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई करून अग्रस्थान मिळवले. धनराज शिर्के (४४ किलो वजनी गट), पंकज पाटील (४८ किलो), तनिष्क कदम (६२ किलो), ओमकार शिंदे (८५ किलो) या चौघांनी महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकावर नाव कोरले. शुभम आचफळने (५२ किलो) रौप्यपदक जिंकले. सोहम कुंभार (४१ किलो), रोहन पाटील (३८ किलो) यांनी कांस्यपदक प्राप्त केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar national wrestling championship maharashtra wins triple title akp
First published on: 18-12-2021 at 01:47 IST