scorecardresearch

लीग-१ फुटबॉल : एम्बापे, नेयमारमुळे सेंट-जर्मेन विजयी

एम्बापेने ७४ आणि ८०व्या, तर नेयमारने ८३व्या गोलची नोंद करताना वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण केल्या.

पॅरिस : किलियन एम्बापे आणि नेयमार या तारांकित आघाडीपटूंच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेन संघाने लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात क्लेर्मोन्टचा ६-१ असा धुव्वा उडवला. या सामन्यात लिओनेल मेसीच्या पासवर नेयमारने सहाव्या, तर एम्बापेने १९व्या मिनिटाला  गोल करत सेंट-जर्मेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, क्लेर्मोन्टच्या जोडेल दोसूने ४२व्या मिनिटाला गोल केल्याने मध्यंतराला सेंट-जर्मेनकडे २-१ अशी केवळ एका गोलची आघाडी होती. उत्तरार्धात सेंट-जर्मेनने अधिक आक्रमक खेळ केला. नेयमारने ७१व्या मिनिटाला पेनल्टीच्या साहाय्याने गोल झळकावताना सेंट-जर्मेनला पुन्हा दोन गोलची आघाडी मिळवून दिली. मग एम्बापेने ७४ आणि ८०व्या, तर नेयमारने ८३व्या गोलची नोंद करताना वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kylian mbappe and neymar score hat tricks as psg beat clermont foot in ligue 1 zws