scorecardresearch

ला लिगा फुटबॉल : बार्सिलोना-एस्पान्योल सामन्यात बरोबरी

घरचे मैदान ‘कॅम्प नाव’वर झालेल्या या सामन्याच्या सातव्या मिनिटाला मार्कोस अलोन्सोने गोल करत बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.

ला लिगा फुटबॉल : बार्सिलोना-एस्पान्योल सामन्यात बरोबरी
जोसेलू

बार्सिलोना : बराच वेळ आघाडीवर असूनही बार्सिलोना एस्पान्योलविरुद्ध ला लिगा फुटबॉलच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

घरचे मैदान ‘कॅम्प नाव’वर झालेल्या या सामन्याच्या सातव्या मिनिटाला मार्कोस अलोन्सोने गोल करत बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी बार्सिलोनाने ७३व्या मिनिटापर्यंत टिकवली. परंतु अलोन्सोच्याच चुकीमुळे एस्पान्योलला पेनल्टी मिळाली. अलोन्सोने एस्पान्योलचा आघाडीपटू जोसेलूला पेनल्टी कक्षात अयोग्यरीत्या पाडले. जोसेलूनेच मग पेनल्टीच्या संधीचे सोने केले आणि एस्पान्योलला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघ विजयी गोल करण्यात अपयशी ठरले.

दरम्यान, ७८व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या जॉर्डी अल्बाला, तर ८०व्या मिनिटाला एस्पान्योलच्या व्हिनिशियस सुझाला लाल कार्ड मिळाले. त्यामुळे त्यांना मैदानाबाहेर जावे लागले आणि दोन्ही संघांना अखेरची काही मिनिटे १०-१० खेळाडूंनिशी खेळावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 02:12 IST

संबंधित बातम्या