एपी : आघाडीपटू पिएर एमरीक ऑबामेयांगच्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलच्या सामन्यात रेयाल माद्रिदला ४-० असा शह दिला. ‘एल क्लासिको’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या दोन बलाढय़ स्पॅनिश संघांमधील सामन्याकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष असते. या दोन संघांमधील मागील पाचही सामने रेयालने जिंकले होते. मात्र नवे प्रशिक्षक झावी यांच्या मार्गदर्शनात बार्सिलोनाच्या कामगिरीत सामन्यागणिक सुधारणा होत असून रेयालविरुद्ध रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात त्यांनी अप्रतिम खेळ केला. 

बार्सिलोनाने या सामन्यात सुरुवातीपासूनच रेयालच्या बचावफळीवर दडपण टाकले. पूर्वार्धात ऑबामेयांग (२९वे मिनिट) आणि रोनाल्ड अरौहो (३८वे मि.) यांनी गोल करत मध्यांतराला बार्सिलोनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

Delhi Capitals suffered a major blow as Mitchell Marsh
Delhi Capitals : ऋषभ पंतच्या संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू अचानक IPL सोडून मायदेशी परतला
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत

उत्तरार्धात चार मिनिटांच्या कालावधीत फेरान टोरेस (४७वे मि.) आणि ऑबामेयांग (५१वे मि.) यांनी आणखी दोनची भर घातल्याने बार्सिलोनाने हा सामना ४-० असा जिंकला. या निकालानंतर रेयाल (२९ सामन्यांत ६६ गुण) आणि बार्सिलोना (२८ सामन्यांत ५४ गुण) हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.