scorecardresearch

ला लिगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात बेन्झिमाची चमक

करीम बेन्झिमाने उत्तरार्धात झळकावलेल्या दोन गोलच्या जोरावर ला लिगा फुटबॉलमध्ये रेयाल माद्रिद संघाने व्हलाडोलिडवर २-० अशा फरकाने विजय मिळवला.

ला लिगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात बेन्झिमाची चमक
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

बार्सिलोना : दुखापतीमुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी न झालेल्या करीम बेन्झिमाने उत्तरार्धात झळकावलेल्या दोन गोलच्या जोरावर ला लिगा फुटबॉलमध्ये रेयाल माद्रिद संघाने व्हलाडोलिडवर २-० अशा फरकाने विजय मिळवला.

बेन्झिमा दोन नोव्हेंबरनंतर आपला पहिला सामना खेळत होता. दुखापतीमुळे फ्रान्सकडून तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला नाही. रेयाल माद्रिदकडून तो सामन्याच्या उत्तरार्धात मैदानात उतरला आणि आपल्या संघाला तीन गुण मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला. या विजयामुळे माद्रिद लीगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. रेयाल माद्रिदचे १५ सामन्यांत ३८ गुण झाले आहे आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोनाच्या एक गुणांनी ते पुढे आहे. बार्सिलोनाने रेयाल माद्रिदपेक्षा एक सामना कमी खेळला आहे.

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये चुरस पहायला मिळाली. त्यामुळे सामना हा मध्यांतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात सामन्यात ८२व्या मिनिटाला व्हलाडोलिडच्या सर्जेओ लेऑनने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. एका मिनिटानंतरच बेन्झिमाने (८३ व्या मि.) पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करत सामना बरोबरीत आणला. यानंतर ८९व्या मिनिटाला बेन्झिमाने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला भेदत गोल केला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. संघाने अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय नोंदवला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 01:05 IST

संबंधित बातम्या