scorecardresearch

आशियाई  बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य पहिल्याच फेरीत गारद

दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांना मात्र दुसरी फेरी गाठण्यात यश आले.

मनिला : भारताचे आघाडीचे खेळाडू लक्ष्य सेन आणि बी. साईप्रणीत यांना आशिया अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांना मात्र दुसरी फेरी गाठण्यात यश आले.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्यला पुरुष एकेरीत चीनच्या बिगरमानांकित ली शी फेंगकडून ५६ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१२, १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. साईप्रणीतला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या जोनटन ख्रिस्टीने १७-२१, १३-२१ असे सरळ गेममध्ये नमवले. किदम्बी श्रीकांतने मलेशियाच्या त्झे योंग एनजीला २२-२०, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत करत आगेकूच केली. दुसऱ्या फेरीत त्याचा चीनच्या वेंग होंग यांगशी सामना होणार आहे. महिला एकेरीत दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सायनाने दक्षिण कोरियाच्या सिम युजिनवर २१-१५, १७-२१, २१-१३ अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. या फेरीत तिच्यापुढे चीनच्या झी यी वांगचे आव्हान असेल. सिंधूने चायनीझ तैपेइच्या पाइ यु पोला १८-२१, २७-२५, २१-९ असे नमवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lakshya sen defeat in first round of badminton asia championships zws

ताज्या बातम्या