scorecardresearch

Premium

Lasith Malinga: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लसिथ मलिंगाचे MI संघात पुनरागमन, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी

IPL 2024 Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. मलिंगा संघात गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो शेन बाँडची जागा घेणार.

Lasith Malinga returns to Mumbai Indians,
लसिथ मलिंगा (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Lasith Malinga appointed bowling coach of Mumbai Indians: आयपीएल २०२४ साठी लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. मलिंगा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील होत आहे. तो मुंबई इंडियन्समध्ये न्यूझीलंडचा क्रिकेटर शेन बाँडची जागा घेणार आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्सशी संबंधित होता. राजस्थान रॉयल्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सपोर्ट स्टाफ म्हणून मुंबई इंडियन्ससोबत मलिंगाचा हा दुसरा कार्यकाळ असेल. याआधी २०१८ मध्येही तो मुंबईच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होता. ते मुंबईसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते.

राजस्थान सोडल्यानंतर मलिंगा मुंबईत परतला –

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून ८ हंगाम खेळणारा लसिथ मलिंगा आतापर्यंत राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. २०२१ मध्ये निवृत्त झाल्यानंतर, मलिंगा २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला होता. त्याने रॉयल्ससोबत दोन हंगाम काम केले. या दोन वर्षात त्याला राजस्थान रॉयल्समध्ये कुमार संगकाराची साथ होती, जो संघाचा क्रिकेट संचालक आहे.

Shubman Gill infected with dengue
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल खेळणार की नाही? राहुल द्रविडने त्याच्या प्रकृतीबाबत दिली लेटेस्ट अपडेट
19th Asian Games Updates
Asian Games: भारतीय पुरुषांनी सुवर्ण तर महिला संघाने ट्रॅप नेमबाजीत जिंकले रौप्यपदक, जाणून घ्या एकूण पदसंख्या
Very few people like you Gambhir's birthday post for Naveen-ul-Haq who will clash with Kohli
Naveen-ul-Haq: विराट कोहलीशी भिडणाऱ्या नवीन-उल-हकच्या वाढदिवशी गंभीरची पोस्ट व्हायरल; म्हणाला, “आपके जैसे बहुत कम लोग…”
Samit Dravid: Amazing work of Rahul Dravid's son Samit included in Karnataka team for Vinoo Mankad Trophy
Rahul Dravid’s son: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्युनिअर द्रविडची शानदार कामगिरी, अंडर-१९ संघात झाली निवड

लसिथ मलिंगाने मुंबई संघाची ८ वर्षे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली –

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा लसिथ मलिंगा २०१७ पर्यंत मुंबईकडून खेळला. मलिंगाच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच विजेतेपदे (२०१३, २०१५, २०१७ आणि २०१९) जिंकली आहेत. याशिवाय २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात लसिथ मलिंगा देखील होता. मलिंगाने मुंबईसाठी एकूण १३९ सामने खेळले आणि ७.१२ च्या इकॉनॉमी रेटने १९५ बळी घेतले. त्यापैकी १७० विकेट्स आयपीएलमध्ये घेतल्या आहेत.

हेही वाचा – IND vs IRE: ‘नाद करा पण बुमराहचा कुठं…!’ पहिल्याच टी-२० सामन्यात ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय कर्णधार

लसिथ मलिंगाने घेतली शेन बाँडची जागा –

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू शेन बाँड आतापर्यंत मुंबई इंडियन्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होता. शेन बाँड २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. तथापि, शेन बाँडच्या जाण्यानंतर एमआय आयएलटी-२० मध्ये एमिरेट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत राहतील की नाही हे अद्याप माहित नाही. त्यांना या वर्षी जानेवारी महिन्यात ही जबाबदारी देण्यात आली होती.

हेही वाचा – Gautam Gambhir: ‘…म्हणून गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्सची साथ सोडणार’, जाणून घ्या काय आहे कारण?

न्यूझीलंडसाठी शेन बाँडची शानदार राहिली कारकीर्द –

शेन बाँडची न्यूझीलंडसाठी दमदार कारकीर्द राहिली आहे. बाँडने न्यूझीलंडसाठी १८ कसोटी, ८२ एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८७ विकेट्स आहेत. त्याचबरोबर त्याने वनडेत १४७ विकेट घेतल्या. याशिवाय त्याने टी-२० मध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तो आयपीएलमध्ये ८ सामनेही खेळला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lasith malinga appointed bowling coach of mumbai indians for ipl 2024 season vbm

First published on: 19-08-2023 at 20:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×