Laver Cup Tennis Tournament Djokovic makes a strong comeback tennis court ysh 95 | Loksatta

लेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नोव्हाक जोकोव्हिचने टेनिस कोर्टवर दमदार पुनरागमन करताना लेव्हर चषक टेनिस स्पर्धेत युरोप संघासाठी एकेरी आणि दुहेरीच्या लढतीत विजयांची नोंद केली.

लेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन
नोव्हाक जोकोव्हिच

लंडन : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नोव्हाक जोकोव्हिचने टेनिस कोर्टवर दमदार पुनरागमन करताना लेव्हर चषक टेनिस स्पर्धेत युरोप संघासाठी एकेरी आणि दुहेरीच्या लढतीत विजयांची नोंद केली. त्याच्या कामगिरीमुळे युरोप संघाने जागतिक संघाविरुद्ध ८-४ अशी आघाडी घेतली आहे.

जोकोव्हिचने एकेरीत जागतिक संघाच्या फ्रान्सिस टिआफोचा ६-१, ६-३ असा सहज पराभव केला. त्यानंतर तासाभरात त्याने इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीच्या साथीने जागतिक संघाच्या जॅक सॉक-अ‍ॅलेक्स डी मिनौर जोडीला ७-५, ६-२ असे पराभूत केले. विम्बल्डन स्पर्धेनंतर कोविड लस न घेतल्यामुळे जोकोव्हिचला अमेरिकेत झालेल्या विविध स्पर्धापासून दूर राहावे लागले.

त्यापूर्वी पहिल्या एकेरीच्या लढतीत बेरेट्टिनीने जागतिक संघाच्या फेलिक्स ऑगर अ‍ॅलिसिमेचे आव्हान ७-६ (१३-११), ४-६, १०-७ असे परतवून लावले. दुसऱ्या एकेरीच्या लढतीत जागतिक संघाच्या टेलर फ्रिट्झने कॅमेरुन नॉरीवर ६-१, ४-६, १०-८ असा विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
IND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर

संबंधित बातम्या

सूनेमुळे बीसीसीआय अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; रॉजर बिन्नी यांना बजावली नोटीस
६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ
Video: हार्दिक पांड्याच्या पार्टीत धोनीचा जलवा; डान्स पाहून पांड्याच्या बायकोची ‘ती’ कमेंट चर्चेत
आशिष नेहराची मोठी भविष्यवाणी; ‘हा’ युवा फलंदाज भारतीय संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो
जेलमधल्या सहा महिन्यांच्या मुक्कामात नवज्योत सिंह सिद्धूचं वजन ३४ किलोंनी घटलं; कशामुळे ते वाचा…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा
पुणे: कोथरुड भागात गांजा विक्री एकास अटक; साडेसात किलो गांजा जप्त
पुणे: शिवाजीनगर, डेक्कन परिसरात गुरुवार, रविवार वीजपुरवठा बंद
सुनेमुळे बीसीसीआय अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; रॉजर बिन्नी यांना बजावली नोटीस
पिंपरीः‘टाटा मोटर्स’कार विभागाचा रखडलेला वेतनवाढ करार मार्गी; कामगारांमध्ये नाराजी