भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीच्या साथीने डेलरे बीच खुली टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारत-फ्रान्सच्या बिगरमानांकित जोडीने एक तास १२ मिनिटे चाललेल्या लढतीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित एरिक ब्युटोरॅक आणि स्कॉट लिपस्कीचा ६-४, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत पेस-चार्डी जोडीची मार्सेल ग्रँनॉलर्स (स्पेन) आणि सॅम ग्रोथ (ऑस्ट्रेलिया) जोडीशी गाठ पडणार आहे.