लय भारी..! प्रमुख स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा; सेहवाग आणि युवराज खेळणार!

ही स्पर्धा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि…

Legends League Cricket indian team announced for the tournament
सेहवाग आणि युवराज

लेजेंड्स क्रिकेट लीग ही निवृत्त खेळाडूंची स्पर्धा ओमानमध्ये जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात तीन संघ आहेत. या स्पर्धेत इंडिया महाराजास नावाने भारताचा एक संघ असेल आणि त्यात वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्यासह अनेक खेळाडू असतील जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसले आहेत. त्यात भारताव्यतिरिक्त रेस्ट ऑफ द वर्ल्ड आणि आशिया लायन्स हे संघही असतील. शोएब अख्तर, सनथ जयसूर्यासारखे दिग्गज आशियाकडून खेळताना दिसणार आहेत.

याआधी सचिन तेंडुलकर या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची अटकळ बांधली जात होती मात्र नंतर तेंडुलकर या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे समोर आले. तीन संघांची ही स्पर्धा खूपच रंजक होण्याची अपेक्षा आहे. संघांची घोषणा करण्यात आली आहे. येथे भारताच्या संघातील खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – IPL 2022 : केएल राहुल झाला मालामाल; १५ कोटी घेत बनला ‘या’ संघाचा कॅप्टन!

कधी आणि केव्हा पाहता येतील सामने?

ही स्पर्धा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि २९ जानेवारी २०२२ पर्यंत चालेल. लीगचे वेळापत्रक आले आहे. साखळी फेरीत गट विभागले गेले आहेत. एकूण दोन फेऱ्या खेळल्या जातील आणि प्रत्येक फेरीत तीन सामने असतील. पहिल्या सामन्यात इंडिया महाराजासचा सामना आशिया लायन्सशी होणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहेत. तुम्ही हे सामने Sony Ten 1 आणि Sony Ten 3 चॅनेलवर पाहू शकता, तसेच भारतात लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी SonyLIV अॅप डाउनलोड करू शकता.

इंडिया महाराजास संघ

वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया, अमित भंडारी.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Legends league cricket indian team announced for the tournament adn

Next Story
IPL 2022 : केएल राहुल झाला मालामाल; १५ कोटी घेत बनला ‘या’ संघाचा कॅप्टन!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी