मागील काही दिवसांपासून राज्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( एमसीए ) निवडणुकीची चर्चा रंगली होती. या निवडणुकीत शरद पवार-आशिष शेलार गटाचे अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे संदीप पाटील यांच्यात ‘सामना’ रंगला होता. अखेरी गुरुवारी ( २० ऑक्टोंबर ) मतमोजणीनंतर अमोल काळे यांचा विजय झाला आहे.

अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना १५८ मतं पडली आहेत. २५ मतांनी काळेंनी संदीप पाटलांचा पराभव केला आहे. त्यानंतर संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोल काळेचं कौतुक करतो. तसेच, आगामी काळात मुंबई क्रिकेटसाठी चांगले काम करण्यासाठी शुभेच्छाही पाटील यांनी दिल्या आहेत.

Giriraj Singh interview issue of Kashi Mathura and Ayodhya Lok Sabha Election 2024
काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

हेही वाचा : शरद पवारांनी आशिष शेलारांबरोबर युती का केली?, संदीप पाटील म्हणाले…

“एमसीएच्या निवडणुकीनंतरही हे सर्व राजकारणी एकत्र राहतील ही अपेक्षा आहे. मुंबई क्रिकेट महत्वाचे असून, संदीप पाटील महत्वाचा नाही. भविष्यात मुंबई किक्रेटसाठी काही जबाबदारी मिळाली, तर निश्चित काम करेल. कारण, त्यासाठी मी घडलो आहे. आयुष्यभर मुंबई क्रिकेटसाठी काही ना काही करावे वाटेल,” असेही संदीप पाटील यांनी नमूद केलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.